आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ च्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटने चांगलीच कामगिरी केली आहे. इंग्लंडच्या डावाची सुरुवात धमाकेदार झाली. मात्र नियमित अंतराने त्यांच्या विकेट देखील पडत होत्या. अशात अनुभवी जो रूटने संघाची बाजू लावून धरली. याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धाव करण्याबाबत रुटने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले. (World Cup 2023)
गुरुवार पासून सुरु झालेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रूटचे शतक हुकले. तो ७७ धावांवर बाद झाला. पण या खेळीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खास कामगिरी त्याच्या नावावर नोंदली गेली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धाव करण्याबाबत रुटने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले. गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ हजार ५७५ धावा केल्या आहेत. आता रुटच्या नावावर १८ हजार ६३२ धावा झाल्या आहेत. इतक नाही तर इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रुटच्या नावावर आहे. (World Cup 2023)
(हेही वाचा : Pension Adalat : पालकमंत्र्यांच्या ‘पेन्शन अदालत’मध्ये पहिल्याच दिवशी १२९ निवृत्त कर्मचाऱ्यांची सुनावणी)
इंग्लंडचा माजी कर्णधार रूटने न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत करिअरमधील ३७वे अर्धशतक पूर्ण केले. त्याच बरोबर वनडेत न्यूझीलंडविरुद्ध १ हजार धावा करणारा तो पहिला इंग्लंडचा फलंदाज ठरला आहे. याआधी इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला अशी कामगिरी करता आली नव्हती. रुटने न्यूझीलंडविरुद्ध २६ सामन्यात १ हजार ४८ धावा केल्या आहेत.