-
ऋजुता लुकतुके
माजी इंग्लिश कर्णधार जो रुटने (Joe Root) मुलतान कसोटीत पाकिस्तान विरुद्ध ३५ वं शतक ठोकत सुनील गावसकरांची (Sunil Gavaskar) ३४ कसोटी शतकांचा विक्रम मागे टाकला आहे. मुलतान कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात जो रुटने शतक पूर्ण केलं. त्याबरोबरच इंग्लिश फलंदाज ॲलिस्टर कूकच्या १२,४७२ कसोटी धावाही मागे टाकल्या. जो रुट तेज गोलंदाजी तसंच फिरकीला कुशलपणे तोंड देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या घडीला तो जगातील सर्वोत्तम कसोटी फलंदाजांपैकी एक आहे.
१९७० आणि ८० च्या दशकात वेस्ट इंडिजच्या तेज गोलंदाजांचा दबदबा होता तेव्हा सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी पहिल्यांदा सलामीवीर म्हणून आपली ताकद दाखवून दिली. वेस्ट इंडिज आणि इंग्लिश तेज माऱ्याला सामोरं जात गावसकर यांनी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा १०,००० धावा पूर्ण केल्या. ३४ षटकांचा टप्पाही पहिल्यांदाच गाठला. सुनील गावसकर यांनी कसोटीतील सर्वोत्तम सलामीवीर मानलं जायचं. (Joe Root)
👏 R💯T! 😍
A day to remember 🙌
Match Centre: https://t.co/M5mJLlHALN
🇵🇰 #PAKvENG 🏴 | @Root66 pic.twitter.com/gl6aSuOE8Q
— England Cricket (@englandcricket) October 9, 2024
त्यानंतर सुनील गावसकर यांचे हे दोन्ही विक्रम सर्वप्रथम सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) मोडले. सचिनने कसोटीत ५० शतकांचा टप्पाही पार केला. (Joe Root)
(हेही वाचा- dadar railway station : जाणून घ्या मराठी माणसाच्या “दादर” चा इतिहास!)
आता सचिनच्या विक्रमांचा पाठलाग जो रुट करताना दिसत आहे. सध्याच्या घडीला जगातील ‘फॅब फोर’ खेळाडू आहेत ते म्हणजे केन विल्यमसन (Kane Williamson), विराट कोहली (Virat Kohli), जो रुट (Joe Root) आणि स्टिव्ह स्मिथ (Steve Smith). या खेळाडूंमध्ये धावांच्या बाबतीत सध्या जो रुट आघाडीवर आहे. सचिनने कसोटीत १५,००० च्या वर धावा केल्या आहेत. जो रुटने आता शतकांच्या बाबतीत महेला जयवर्धने, ब्रायन लारा आणि युनिस खान यांना मागे टाकलं आहे. सर्वाधिक धावांच्या क्रमवारीत आता जो रुट सचिन, पाँटिंग, कॅलिस, राहुल द्रविड यांच्या पाठोपाठ पाचव्या क्रमांकावर आहे. तर शतकांच्या बाबतीतही तो आता पाचव्या क्रमांकावर आहे. आणखी एका शतकानंतर तो राहुल द्रविडच्या ३५ आंतरराष्ट्रीय शतकांची बरोबरी करेल. (Joe Root)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community