ऋजुता लुकतुके
इंग्लिश क्रिकेट बोर्डाने २८ वर्षीय तेज गोलंदाज जोफ्रा आर्चरला आयपीएल (Jofra Archer to Miss IPL?) न खेळण्याचा सल्ला दिल्याचं समोर आलं आहे. पुढील वर्षी जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टी-२० चषकासाठी इंग्लंड संघाने तयारी सुरू केली आहे. आणि या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी ताजंतवानं रहावं यासाठी आर्चरने आयपीएलमध्ये खेळू नये, असं इंग्लिश बोर्डाला वाटतंय. आर्चर हा वारंवार दुखापत होण्यासाठी प्रसिद्ध आहे.
भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेसाठीही तो इंग्लंडच्या संघात होता. पण, एका आठवड्यातच दुखापतीमुळे तो मायदेशी परतला. २०२२ मध्ये मुंबई इंडियन्स संघाने आर्चरला ८ कोटी रुपये मोजून खरेदी केलं होतं. या हंगामात संघाच्या रणनीतीत तो महत्त्वाचा खेळाडू होता. पण, आश्चर्यकारकरित्या यंदा संघ प्रशासनाने आर्चरला करारातून लिलावासाठी मुक्त केलं.
त्यानंतर १९ डिसेंबरला दुबईत खेळाडूंचा लिलाव होणार आहे. त्यासाठी नोंदणी केलेल्या खेळाडूंच्या यादीतही आर्चर नव्हता.
𝗜𝗣𝗟 𝟮𝟬𝟮𝟰 𝗔𝘂𝗰𝘁𝗶𝗼𝗻 🔨
🗓️ 19th December
📍 𝗗𝗨𝗕𝗔𝗜 🤩
ARE. YOU. READY ❓ #IPLAuction | #IPL pic.twitter.com/TmmqDNObKR
— IndianPremierLeague (@IPL) December 3, 2023
मे महिन्यांत आयपीएल खेळताना आर्चरचं कोपर दुखावलं होतं. त्यानंतर तो व्यावसायिक क्रिकेट खेळू शकला नव्हता. यावर्षी तो संघात परतला तरी दुखापतींचा ससेमिरा सुरूच होता. विश्वचषकही अर्धवट सोडून त्याला परतावं लागलं. आणि अशावेळी त्याने आपल्या तंदुरुस्तीकडे जास्त ध्यान द्यावं असं इंग्लिश क्रिकेट बोर्डाचं म्हणणं आहे.
बोर्डाबरोबर आर्चरने (Jofra Archer to Miss IPL?) दोन वर्षांचा करार केला आहे. त्यामुळे त्याला जपून वापरण्याचा इंग्लिश बोर्डाचा प्रयत्न आहे. आणि तो तंदुरुस्त रहावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community