Junior Shooting World Cup : भारतात होणार ज्युनिअर नेमबाजी विश्वचषक

Junior Shooting World Cup : नेमबाजीतली ही देशात होणारी नववी मोठी स्पर्धा आहे.

20
Junior Shooting World Cup : भारतात होणार ज्युनिअर नेमबाजी विश्वचषक
  • ऋजुता लुकतुके

पुढील वर्षीचा ज्युनिअर नेमबाजी विश्वचषक भारतात नवी दिल्ली इथं पार पडणार आहे. नॅशनल रायफल असोसिएशनने नुकताच या बातमीला दुजोरा दिला आहे. मागच्या १० वर्षांत भारतात होणारी ही नववी आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा असेल. गेल्याच वर्षी भारताने आयएसएसएफच्या दोन महत्त्वाच्या स्पर्धा भरवल्या होत्या. भोपाळमध्ये झालेला नेमबाजी विश्वचषक आणि त्यानंतर नेमबाजी विश्वचषकाची अंतिम स्पर्धाही भारतात झाली होती. (Junior Shooting World Cup)

(हेही वाचा – Ayodhya temple: प्राणप्रतिष्ठेला एक वर्ष पूर्ण… अयोध्यानगरी होणार राममय, कशी चालू आहे तयारी?)

‘गेल्या महिन्यात रोम इथं आमची एएसएसएफ संघटनेबरोबर एक महत्त्वाची बैठक झाली. तेव्हाच ज्युनिअर विश्वचषकासाठी आम्ही दावा केला होता. आयएसएसएफचंही भारताच्या आयोजनाविषयी चांगलं मत आहे. गेल्या काही वर्षांत भारतात झालेल्या स्पर्धांविषयी ते समाधानी दिसले,’ असं रायफल असोसिएशनचे अध्यक्ष कालिकेश नारायण सिंग देव यांनी सांगितलं. रायफल, पिस्तुल आणि शॉटगन असे तीनही प्रकार विश्वचषकात होणार आहेत. (Junior Shooting World Cup)

(हेही वाचा – Shri Krishna Janmabhoomi मुक्ती ट्रस्टच्या अध्यक्षांना पाकिस्तानमधून धमकी)

पुढील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला ही स्पर्धा घेण्याचा रायफल असोसिएशनचा विचार आहे. आणि लवकरच तारखा निश्चित करण्यात येणार आहेत. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण जिंकल्यापासून भारताची नेमबाजी प्रकारातील ताकद आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध झाली आहे. तेव्हापासून २०१६ चा रिओ ऑलिम्पिकचा अपवाद सोडला तर भारताने नेमबाजीत कायम किमान एक पदक जिंकलं आहे. यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकेरने एकाच स्पर्धेत दुहेरी पदक जिंकण्याची किमया केली आहे. (Junior Shooting World Cup)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.