K. L. Rahul : के. एल. राहुल ऑस्ट्रेलियातील पहिल्या परीक्षेतही फेल

39
K. L. Rahul : के. एल. राहुल ऑस्ट्रेलियातील पहिल्या परीक्षेतही फेल
K. L. Rahul : के. एल. राहुल ऑस्ट्रेलियातील पहिल्या परीक्षेतही फेल
  • ऋजुता लुकतुके

भारत ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए सामन्यासाठी के एल राहुल आणि ध्रुव जुरेल यांना खासकरून भारतातून पाठवून देण्यात आलं होतं. दोघांनी तिथे सरावाची संधी मिळावी हा त्यामागचा हेतू होता. शिवाय रोहित पहिल्या दोन कसोटी खेळणार नसल्यामुळे राहुलची सलामीवीर म्हणूनही चाचपणी शक्य होणार होती. पण, पहिल्या कसोटीत राहुल ४ धावा करून बाद झाला आहे. बोलंडच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकाकडे झेल देऊन तो तंबूत परतला. (K. L. Rahul)

(हेही वाचा- शरद पवारांबाबातच्या वक्तव्यानंतर Sadabhau Khot यांची जाहीर माफी)

स्कॉट बोलँडचा समावेश आगामी बोर्डर – गावसकर चषकासाठीच्या ऑस्ट्रेलियान संघातही झाला आहे. राहुलच्या बरोबर भारतीय संघात असलेल्या अभिमन्यू ईश्वरनला तर भोपळाही फोडता आला नाही. ध्रुव जुरेलने मात्र मिळालेल्या संधीचा फायदा उचलत ८० धावा केल्या आहेत. राहुल आणि ईश्वरन दोघंही पहिल्या सत्रातच तंबूत परतले. रोहीतच्या अनुपस्थितीत अभिमन्यू ईश्वरन भारतीय संघात येईल असं बोललं जातंय. (K. L. Rahul)

ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या कसोटीत पहिल्या दिवशी भारतीय संघाची सुरुवात डळमळीत झाली आहे. १६१ धावांमध्ये भारतीय संघ सर्वबाद झाला. जुरेलच्या खालोखाल देवदत्त पड्डिकलने २६ धावा केल्या. दोघांनी ४ बाद ११ अशी भारतीय संघाची अवस्था झाली असताना पड्डिकल आणि जुरेल यांनी अर्धशतकी भागिदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. प्रसिध कृष्णाने तळाला थोडाफार प्रतिकार केला. त्यामुळे भारतीय संघ निदान १५० चा टप्पा ओलांडू शकला. (K. L. Rahul)

(हेही वाचा- Maharashtra Assembly Election 2024 : भाजपचे बंडखोर, अपक्ष उमेदवारी, आवाहन मात्र तुतारीला मत देण्याचे; नेमके काय घडले ?)

राहुलच्या या अपयशावर सोशल मीडिया यथेच्छ तोंडसुख घेत आहे. तर काहींनी राहुलला सलामीला खेळवल्याबद्दल टीका केली आहे. (K. L. Rahul)

 भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची पहिली कसोटी २२ नोव्हेंबरपासून पर्थ इथं होणार आहे. या कसोटीत रोहित शर्मा खेळणार नाहीए. सलामीच्या जागेसाठी ईश्वरन आणि के. एल. राहुल यांच्यात चुरस असेल. तर मधल्या फळीत राहुल किंवा सर्फराझ यांच्यापैकी एकाला खेळवलं जाईल. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत के एल राहुल सातत्याने अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियात भारत ए संघाबरोबर पाठवण्याची बीसीसीआयची योजना होती. पण, पहिला प्रयत्न अपयशी ठरला आहे. (K. L. Rahul)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.