- ऋजुता लुकतुके
यंदाच्या आयपीएल हंगामात सनरायझर्स हैद्राबादकडून झालेल्या पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार के एल राहुल (K L Rahul) आणि संघाचे मालक संजीव गोयंका यांच्यातील भांडण लक्षवेधी ठरलं होतं. या भांडणानंतर नवीन हंगामात राहुल लखनौबरोबर राहील अशी शक्यता कमीच होती. २०२५ मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ताफ्यात दाखल होईल अशी शक्यता आधीच वर्तवली जात होती. आता खुद्द राहुलनेच तसे संकेत दिले आहेत. के एल राहुलचं एका चाहत्याबरोबरचा व्हीडिओ संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
(हेही वाचा – Neeraj Chopra : डाव्या हाताचं हाड मोडलेलं असताना नीरज खेळला डायमंड्स लीगची अंतिम फेरी )
आणि त्यातून लोकांनी तसा निष्कर्ष काढला आहे. चाहता राहुलला (K L Rahul) विचारतो, ‘तू खरंच बंगळुरू फ्रँचाईजीमध्ये जाणार आहेस का?’ आणि राहुल त्यावर सहज म्हणतो, ‘तशी आशा करूया.’ चाहत्याबरोबरचा राहुलचा हा संवाद आहे. चाहत्याने सुरुवातीला म्हटलं आहे की, ‘मी सुरुवातीपासून आरसीबीचा पाठीराखा आहे. तू पूर्वी या संघासाठी खेळलेला आहेस. आणि सध्याही काही अफवा आम्ही ऐकून आहोत. त्यामुळे मी तर अशीच प्रार्थना करत आहे की, तू आरसीबीमध्ये यावंस आणि चांगल्या कामगिरीने दणाणून सोडावंस.’ यावर राहुलने वरील उत्तर दिलं आहे.
(हेही वाचा – Love Jihad : ‘लव्ह जिहाद’ म्हणजे काय?)
I’m happy that KL Rahul knows about the rumours that are going around for him & RCB.
Please boss change your IPL team! 🙏❤️ pic.twitter.com/Os06Uj39gQ
— Kunal Yadav (@Kunal_KLR) September 14, 2024
के एल राहुल (K L Rahul) हा मूळचा कर्नाटकचा आहे. त्यामुळे २०१३ मध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडूनच आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. पण, पुढील दोन हंगामात तो सनरायझर्स हैद्राबादकडे गेला. २०१६ मध्ये तो परत एकदा बंगळुरू फ्रँचाईजीत आला. पण, २०१७ चा हंगाम दुखापतीमुळे बाहेर राहावं लागल्यानंतर तो पुन्हा एकदा बंगळुरू फ्रँचाईजीतून बाहेर पडला. आणि पुढील तीन हंगाम २०१८ ते २०२१ पर्यंत त्याने पंजाब किंग्ज बरोबर काढले. २०२२ मध्ये लखनौ फ्रँचाईजीची स्थापना झाल्यापासून राहुल या संघाचं नेतृत्व करत आहे. पहिल्या दोन्ही वर्षी राहुलने लखनौ संघाला बाद फेरीपर्यंत पोहोचवलं. २०२४ मध्ये मात्र संघ साखळीतच गारद झाला. त्या दरम्यान राहुल आणि संघमालक गोयंका यांचे संबंध बिघडल्याच्या बातम्याही सुरू झाल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community