K L Rahul : लखनौ फ्रँचाईजी के एल राहुलला कायम ठेवण्याची शक्यता कमीच, नवीन कर्णधाराच्या शोधात

K L Rahul : निकेलस पूरन आणि मयांक यादवला मात्र संघ कायम ठेवणार आहे. 

85
K L Rahul : लखनौ फ्रँचाईजी के एल राहुलला कायम ठेवण्याची शक्यता कमीच, नवीन कर्णधाराच्या शोधात
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलचा मेगा लिलाव पुढील महिन्यात होणार आहे आणि त्यापूर्वी प्रत्येक फ्रँचाईजी संघात कायम ठेवायच्या खेळाडूंची यादी तयार करण्यात गुंतली आहे. लखनौ सुपरजायंट्स फ्रँचाईजी फक्त तीनच खेळाडूंना कायम ठेवणार असल्याचं समजतंय. यात चक्क माजी कर्णधार के एल राहुलचं (K L Rahul) नाव नाहीए. गेल्या हंगामातच राहुल आणि संघ मालक संजीव गोयंका यांच्यातील भांडण गाजलं होतं आणि गोयंका कर्णधारावर खुश नसल्याचं दिसलं होतं. त्यानंतर आता संघाकडून राहुलला डच्चू मिळणार असल्याचं दिसतंय.

स्पोर्ट्स स्टारच्या बातमीनुसार, एलएसजी तीन खेळाडूंना कायम ठेवण्याचा विचार करत आहे. गेल्या मोसमात केएल राहुलच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरनने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती. या खेळाडूला मोठ्या रकमेसह कायम केले जाईल. याशिवाय एलएसजीचा वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि लेगस्पिनर रवी बिश्नोई यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(हेही वाचा – IPL Mega Auction : रिषभ पंतसाठी या तीन संघांनी लावली ‘फिल्डिंग’)

मयंक यादवने नुकतेच बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेतून पदार्पण केले. २२ वर्षीय वेगवान गोलंदाज मयंक यादवला दुसऱ्या प्राधान्याच्या आधारावर कायम ठेवू शकते. यामुळे त्याला १४ कोटी रुपये मिळू शकतात. बीसीसीआयच्या नियमांनुसार दुसऱ्या क्रमांकावर कायम ठेवणाऱ्या खेळाडूला १४ कोटी रुपये द्यायचे आहेत. मयंक युवा आहे आणि त्याने आपल्या गोलंदाजीने खूप प्रभावित केले आहे. अशा परिस्थितीत एलएसजी केवळ त्याला कायम ठेवणार नाही. तर १४ कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेत त्याला कायम ठेवणार आहे. २०२३ मध्ये एलएसजीने या गोलंदाजाला २० लाख रुपयांना खरेदी केलं होतं. सर्व आयपीएल फ्रँचायझी संघांना ३१ ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवण्यासाठी खेळाडूंची यादी सादर करायची आहे. (K L Rahul)

मयंक यादव २०२४ मध्ये फक्त ४ सामने खेळू शकला होता. दुखापतीमुळे त्याला संपूर्ण मोसमात बाहेर बसावे लागले. पण अवघ्या ४ सामन्यांत त्याने आपल्या गोलंदाजीची छाप पाडली आणि ७ बळी मिळवले. पहिल्या दोन सामन्यात तो सामनावीर ठरला होता. त्याने ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ४ बळी घेतले आहेत. (K L Rahul)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.