-
ऋजुता लुकतुके
विश्वचषकाच्या पहिल्या लढतीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला तो के एल राहुल आणि विराट कोहलीच्या खेळीच्या जोरावर. राहुलने शेवटपर्यंत नाबाद राहात संघाला विजय मिळवून दिला. पण, शेवटच्या चेंडूवर षटकार लगवल्यानंतर त्याची प्रतिक्रिया चाहत्यापासून लपलेली नाही. नेमकं काय झालं? (K L Rahul Reaction After The Six)
भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेतील आपला पहिला सामना जिंकला तो विराट कोहली आणि के एल राहुलच्या जोरावर. दोघांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३ बाद २ अशी धावसंख्या असताना आपला जम बसवला आणि १६५ धावांची भागिदारी रचत भारतीय संघाला विजयपथावर नेलं. अखेर ६ गडी आणि ५२ चेंडू राखून भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
भारताला विजयासाठी जेव्हा शेवटच्या ५ धावांची आवश्यकता होती, तेव्हा के एल राहुलने मिडऑनला एक हलका षटकार मारून विजय साकार केला. पण, त्यानंतर स्वत:वरच विश्वास न बसून तो मटकन खाली बसला. त्याची ही प्रतिक्रिया नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. आधी तो व्हीडिओ पाहूया, (K L Rahul Reaction After The Six)
View this post on Instagram
(हेही वाचा – Balasore Train Accident : ‘त्या’ मृतदेहांवर होणार अंत्यसंस्कार)
राहुलचा नेमका कशावर विश्वास बसत नव्हता हे त्यानेच नंतर बक्षीस समारंभाच्या वेळी सांगितलं.
भारताला विजयासाठी ५ धावा हव्या असताना राहुल वैयक्तिक ९१ धावांवर होता. आणि अर्थातच, त्याला शतक पूर्ण करण्याची आस होती. त्यामुळे मिडऑनला हलका फटका मारून चौकार वसूल करायचा आणि त्यानंतरच्या चेंडूवर षटकारासाठी प्रयत्न करायचे असा त्याचा विचार होता.
पण, नेमका पुढचा फटका बॅटवर एकदम मधोमध बसला, टायमिंगही अचूक साधलं गेलं. आणि तोच फटका थेट प्रेक्षकांमध्ये विसावला. आणि राहुल ९७ धावांवर नाबाद राहिला. स्वत:च्या फटक्यावर विश्वास न बसून तो मटकन खाली बसला.
यावर बक्षीस समारंभात राहुल म्हणतो, ‘एकतर इतक्या लवकर फलंदाजीसाठी यावं लागेल, असं वाटलं नव्हतं. आधीचा डाव संपवून मी आंघोळ करत होतो. बाहेर आलो तोच मला तयार व्हावं लागलं. पण, मला फलंदाजीची लय सापडत गेली. आणि विराटबरोबर माझी जोडीही जमली.’ (K L Rahul Reaction After The Six)
त्यानंतर भारतीय डावाच्या शेवटच्या षटकाबद्दल तो बोलला. ‘मला शतक साजरं करण्याची अर्थातच इच्छा होती. मी त्याचाच विचार करून गणित जुळवत होतो. पण, तो फटका अगदी अचूक बसला. आणि चेंडू सीमापार गेलाही. पुन्हा कधीतरी मी शतक साजरं करू शकेन, अशी आशा मी बाळगतो,’ असं सामन्यानंतर मिश्किलपणे बोलताना राहुल म्हणाला. (K L Rahul Reaction After The Six)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community