- ऋजुता लुकतुके
डिसेंबर महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची बॉक्सिंग डे कसोटी सुरू असेल तेव्हाच कसोटीच्या तिसऱ्या दिवशी २८ तारखेला भारतीय मातीतील खेळ कबड्डीचेही दोन प्रदर्शनीय सामने होणार आहेत. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिथे होते, त्या जॉन केन अरेना मैदानावरच चक्क कबड्डीचे प्रदर्शनीय सामने पार पडणार आहेत. मेलबर्न क्रिकेट असोसिएशनच्या मैदानापासूनही हे मैदान अगदी हाकेच्या अंतरावर आहे. (Kabaddi in Australia)
त्यामुळे कबड्डीचा दम आता दूर ऑस्ट्रेलियात घुमताना पाहायला मिळणार आहे. भारतातील प्रो कबड्डी लीगला व्हिजिट व्हिक्टोरिया उपक्रमाकडून आलेल्या आमंत्रणानंतर या सगळ्या घडामोडी घडल्या असून ऑस्ट्रेलियन फुटबॉल लीगमधील खेळाडूंच्या संघाबरोबर प्रो कबड्डी लीगमधील संघाची प्रदर्शनीय लढत होणार आहे. तर दुसरा सामना प्रो कबड्डी लीगचे जुने खेळाडू आणि सध्याचे खेळाडू यांच्यात होणार आहे. या सामन्यांदरम्यान ऑस्ट्रेलियात संपूर्ण भारतीय माहौल पाहायला मिळणार आहे. (Kabaddi in Australia)
(हेही वाचा – Manu Bhaker : मनु भाकर राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार नाही, त्या कालावधीत करणार युरोपमध्ये सराव)
‘भारतीय मातीतील खेळ परदेशात पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. तो ही अशा देशात जिथे खेळांची कदर केली जाते,’ असं प्रो कबड्डी लीगचे अध्यक्ष अनुपम गोस्वामी म्हणाले. ऑस्ट्रेलियाचाही राष्ट्रीय कबड्डी संघ आहे. आणि २०१६ मध्ये भारतात कबड्डीचा अनधिकृत विश्वचषक भरला होता तेव्हा ऑस्ट्रेलियन संघाने खेळातील व्यावसायिकता दाखवून दिली होती. स्पर्धेतील तो एक लोकप्रिय संघ ठरला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियात कबड्डीच्या प्रचाराची संधी आहे, असं प्रो कबड्डीचे आयोजक मशाल स्पोर्ट्सला वाटतंय. (Kabaddi in Australia)
शिवाय कबड्डी सामन्यांच्या दरम्यान कसोटी सामनाही सुरू असल्यामुळे कबड्डी आणि क्रिकेट मिळून या कार्यक्रमाकडे लोकांचं एकत्र लक्ष जाईल, अशी आयोजकांना आशा आहे. प्रो कबड्डी लीग सुरू झाली तेव्हापासून ती परदेशात भरवण्याचं स्वप्न आयोजकांनी पाहिलं आहे. या सामन्यांच्या निमित्ताने प्रो कबड्डी भारताबाहेर जात आहेत. (Kabaddi in Australia)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community