औद्योगिक व व्यावसायिक कामगारांच्या २७ व्या आणि महिलांच्या २२व्या खुल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई येथे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले.
आमदार कालिदास कोळंबकर, विकास आयुक्त (असंघटित कामगार) डॉ.एच.पी.तुम्मोड, कामगार विभागाचे उपसचिव दादासाहेब खताळ, उपसचिव दीपक पोकळे, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे, भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड.अनिल ढुमणे, ज्येष्ठ कबड्डीपटू जया शेट्टी, छाया शेट्टी, भाग्यश्री भुर्के, बाळ वडावलीकर आदी उपस्थित होते.
(हेही वाचा – Tamil superstar Thalapathy Vijay : तमिलगा वेत्री कळघम; तमिळ सुपरस्टार थलापथी विजयने स्थापन केला स्वतंत्र राजकीय पक्ष)
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या प्रभादेवी येथील कामगार क्रीडा भवनाच्या मैदानात दररोज सायंकाळी ४ वाजेपासून स्पर्धेचे सामने खेळवले जातील. सोमवार ५ फेब्रुवारी रोजी स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडेल. पुरुष शहरी, पुरुष ग्रामीण आणि महिला खुला अशा तीन गटात सामने खेळवले जातील. राज्यभरातून ११० संघ स्पर्धेत सहभागी झाले असून यात ५७ संघ पुरुष कामगारांचे असून महिला खुला गटातून ५३ संघ सहभागी झाले आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community