-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघाने अलीकडेच आयसीसीचे दोन महत्त्वाचे चषक जिंकले आहेत. जून २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक आणि २०२५ मध्ये चॅम्पियन्स करंडकावर भारतीय संघाने नाव कोरलं. त्यातून भारताचं टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटवरील प्रभूत्व सिद्ध झालं आहे. तर आयसीसीच्या क्रमवारीतही भारतीय संघच या प्रकारात अव्वळ आहे. आता भारतीय संघाची नजर ही २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकावर असणार आहे. कारण, २०२३ च्या स्पर्धेत थोडक्यात भारतीय संघाचा प्रयत्न हुकला होता. २०२७ च्या संघबांधणीच्या निमित्तीने या दोन प्रकारात भारतीय संघाचे संभाव्य कर्णधार कोण असतील यावरही चर्चा सुरू झाली आहे. (Kapil in Captaincy)
टी-२० प्रकारात रोहित शर्माने निवृत्ती पत्करल्यावर संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. तर एकदिवसीय प्रकारात रोहित अजून खेळतोय. त्याचा सहाय्यक म्हणून शुभमन गिलची निवड झाली आहे. या दोघांकडेच भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. असं असताना, माजी तेज गोलंदाज कपिल देव यांनी मात्र सूर्यकुमार आणि शुभमन गिल यांच्या विरोधात मत दिलं आहे. (Kapil in Captaincy)
(हेही वाचा – IPL 2025, Lucknow Super Giants : तेज गोलंदाज मयंक यादव दुखापतीतून पुनरागमन करण्याच्या तयारीत)
भारतीय संघाला टी-२० आणि एकदिवसीय प्रकारात एक आणि कसोटीत दुसरा कर्णधार असावा अशा मताचे कपिल देव आहेत. हा कर्णधार हार्दिक पांड्या असावा असं त्यांचं म्हणणं आहे. ‘मला विचाराल तर हार्दिक पांड्या माझा टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटसाठीचा कर्णधार असेल. कर्णधार पदासाठी भारतीय संघात चुरस आहे, याची मला कल्पना आहे. पण, माझा भरवसा हार्दिक पांड्यावर आहे. त्याचं वय पाहता तो आणखी काही वर्षं भारतीय संघात खेळू शकेल आणि या दरम्यान संघ बांधणीही त्याला चांगल्या प्रकारे करता येईल,’ असं कपिल देव एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. (Kapil in Captaincy)
हार्दिक पांड्यावर एकंदरीत कपिल देव यांचा कर्णधार म्हणून विश्वास आहे. कारण, हार्दिकने कसोटी क्रिकेटही खेळावं असं त्यांनी म्हटलं आहे. हार्दिक ६ वर्षांपूर्वी भारताकडून शेवटची कसोटी खेळला होता. ‘हार्दिकने कसोटी क्रिकेट खेळलं पाहिजे. ते तो खेळत नाहीए त्यामुळे भारताचा कसोटी आणि टी-२०, एकदिवसीय प्रकारांसाठी वेगवेगळ्या कर्णधारांची नियुक्ती करावी लागेल,’ असं कपिल म्हणाले. हार्दिक पांड्या मागच्या दोन हंगामात आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करत आहे. पण, या दोन्ही हंगामात संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. (Kapil in Captaincy)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community