- ऋजुता लुकतुके
कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या एजीस करंडक स्थानिक स्पर्धेत एक विचित्र अपघात घडला. होयसाला या ३४ वर्षीय क्रिकेटपटूला मैदानातच ह्रदयविकाराचा झटका आला. आणि त्यात त्याचा मृत्यू ओढवला. ही घटना गुरुवारी घडली होती. आणि खेळाडूला रुग्णालयात नेलं असता दोन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. (Karnataka Cricketer Die)
या स्पर्धेत तामिळनाडू आणि कर्नाटक आणि दक्षिण भारतातील संघ सहभागी झाले होते. सामना संपल्यानंतर खेळाडू एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी वर्तुळ करून उभे होते. आणि अचानक होयसाना खाली कोसळला. मैदानावर हजर असलेल्या वैद्यकीय चमूने तातडीने त्याच्यावर उपचार सुरू केले. आणि मग त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. पण, त्याने कुठल्याही उपचारांना प्रतिसाद दिला नाही. (Karnataka Cricketer Die)
कर्नाटकचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री दिनेश गुंडू राव यांनी ट्विटरवर या अपघाताविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘दक्षिण विभागीय स्पर्धेत कर्नाटकचा तेज गोलंदाज के होयसाना मैदानावरच ह्रदयविकाराचा झटका येऊन परण पावला. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्यांच्या कुटुंबीयांचं मी सांत्वन करतो. आणि लहान वयात एखाद्या खेळाडूचा मृत्यू होण्यामुळे ह्रदयविकाराचा आजार कसा जीवघेणा आहे याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. लोकांनी या आजाराबद्दल जागरुक असलं पाहिजे,’ असं दिनेश राव आपल्या संदेशात म्हणतात. (Karnataka Cricketer Die)
Saddened to hear about the sudden demise of Karnataka’s emerging cricketer, fast bowler K. Hoysala, during the Aegis South Zone Tournament.
My heartfelt condolences go out to his family and friends in this hour of grief.
Recent incidents of youth succumbing to cardiac arrest…
— Dinesh Gundu Rao/ದಿನೇಶ್ ಗುಂಡೂರಾವ್ (@dineshgrao) February 23, 2024
(हेही वाचा – Rahul Narvekar यांची लोकसभेची उमेदवारी निश्चित; दक्षिण मुंबईमधून लढवणार निवडणूक?)
के होयसाला हा तेज गोलंदाज होता. आणि खासकरून कर्नाटका प्रिमिअर लीगमध्ये त्याने आपल्या कामगिरीची छाप पाडली होती. बेल्लारी टस्कर्स आणि शिवामोग्गा लायन्स या क्लबकडून खेळताना त्याने चांगलं योगदान दिलं होतं. कर्नाटकच्या क्रिकेट वर्तुळात त्याच्या अकाली जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. (Karnataka Cricketer Die)
तामिळनाडू विरुद्धच्या सामन्यातही होयसालाने १३ चेंडूंत १३ धावा केल्या होत्या. आणि नंतर जम बसलेल्या तामिळ सलामीवीराला तंबूत धाडलं होतं. कर्नाटकने या सामन्यात फक्त एका धावेनं विजय मिळवला. (Karnataka Cricketer Die)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community