-
ऋजुता लुकतुके
माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवने (Kedar Jadhav) नवीन इनिंग सुरू करताना भारतीय जनता पार्टीत (BJP) अधिकृतपणे प्रवेश केला आहे. मंगळवारी मुंबईत भाजपा कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या उपस्थितीत केदारचं पक्षात स्वागत करण्यात आलं. केदार जाधव (Kedar Jadhav) महाराष्ट्र संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळला. तर आयपीएलमध्ये (IPL) तो चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) भाग होता.
‘मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. पंतप्रधान मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी विकासाचं राजकारण करत आहे. मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या नेतृत्वाखाली भाजपात (BJP) प्रवेश करत आहे,’ असं केदार जाधवने (Kedar Jadhav) यावेळी सांगितलं. तर केदारचं स्वागत करताना बावनकुळे यांनी त्याचा उल्लेख प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असा केला. ‘क्रिकेट असो किंवा समाजकारण, केदार जाधव (Kedar Jadhav) यांचा प्रभाव ते काम करतील त्या क्षेत्रात राहिला आहे. ते स्वगृही परतले आहेत, असं मी म्हणेन. नांदेड आणि हिंगोलीतून अनेक लोक आज भाजपात आले आहेत,’ असं बावनकुळे यांनी केदार जाधव (Kedar Jadhav) विषयी बोलून दाखवलं.
(हेही वाचा – Hanuman Jayanti 2025 चे तारीख, इतिहास आणि महत्त्व)
प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव यांचे भाजपा परिवारात स्वागत…
#bjp #Maharashtra pic.twitter.com/mZspUf2sbR— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 8, 2025
केदार जाधवकडे (Kedar Jadhav) भाजपा युवा नेता म्हणून पाहत आहे. केदार जाधवचा (Kedar Jadhav) जन्म २६ मार्च १९८५ ला पुण्यात झाला आहे. २०१४ साली त्याने भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर भारताकडून ७३ एकदिवसीय सामने खेळताना त्याने ४२ धावांच्या सरासरीने १,३८९ धावा केल्या आहेत. तर ऑफ स्पिन गोलंदाजीवर त्याने २७ बळीही मिळवले आहेत. केदार जाधव (Kedar Jadhav) २०१७ साली पुण्यात त्याने केलेल्या शतकासाठी ओळखला जातो. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघ ३५१ धावांचा पाठलाग करत होता. संघाची अवस्था ४ बाद ६२ अशी बिकट असताना त्याने तेव्हाचा कर्णधार विराट कोहलीसोबत (Virat Kohli) २०० धावांची भागिदारी रचली होती. ७६ चेंडूंत १२० धावा करताना त्याने भारतीय संघाला विजयही मिळवून दिला.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये केदार जाधव (Kedar Jadhav) महाराष्ट्र संघाचा अविभाज्य भाग होता. तर आयपीएलमध्ये (IPL) तो दिल्ली डेअरडेव्हिल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैद्राबाद या चार फ्रँचाईजींकडून खेळला. गेल्यावर्षी जून महिन्यात त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. तेव्हापासूनच त्याच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community