Kedar Jadhav Retired : केदार जाधव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

Kedar Jadhav Retired : केदार जाधव भारतीय संघाकडून ७३ एकदिवसीय सामने खेळला आहे.

162
Kedar Jadhav Retired : केदार जाधव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
  • ऋजुता लुकतुके

महाराष्ट्राचा शैलीदार फलंदाज केदार जाधवने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर आपल्या कारकीर्दीतील काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्याने एक छोटा संदेश लिहून निवृत्तीची घोषणा केली. केदारने लिहिलेला संदेश हा माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी मिळता जुळता आहे. त्यामुळे दोघांमधील मैत्रीही पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. (Kedar Jadhav Retired)

‘आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी दिलेलं प्रेम आणि पाठिंब्यासाठी मी तुमचा ऋणी आहे. सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून मी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे,’ असं केदारने आपल्या इन्स्टाग्रामवरील संदेशात लिहिलं आहे आणि सोबत किशोर कुमारचं गाणंही त्याने ठेवलं आहे. (Kedar Jadhav Retired)

केदारचा भारतीय क्रिकेटमधील आदर्श असलेला महेंद्रसिंग धोनीनेही २०२० मध्ये आपली निवृत्ती अशाच प्रकारे इन्स्टाग्रामवर जाहीर केली होती. तो दिवस होता १५ ऑगस्ट २०२०. आणि धोणी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळून तेव्हा बरोबर एक वर्ष झालं होतं. २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकात धोनी भारतासाठी आपला शेवटचा सामना खेळला होता. निवृत्ती जाहीर करताना धोनीचा संदेश होता, ‘तुमचं प्रेम आणि पाठिंब्यासाठी आभार. आज १७ वाजून २९ मिनिटांपासून मी निवृत्त होत आहे.’ (Kedar Jadhav Retired)

 

View this post on Instagram

 

A post shared by M S Dhoni (@mahi7781)

(हेही वाचा – NCP : राष्ट्रवादीचा अजित पवार गट राष्ट्रीय होण्याच्या प्रयत्नात; तर शरद पवारांचा गट हा अजूनही हक्काच्या प्रतिक्षेत)

केदार जाधव २०१४ ते २०२० या कालावधीत भारतीय संघातून ७३ एकदिवसीय सामने आणि ९ टी-२० सामने खेळला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ४२ च्या तगड्या सरासरीसह १,३८९ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईकरेटही १०१ धावांचा होता. यात त्याने २ शतकं आणि ७ अर्धशतकं ठोकली आहेत. तर आपल्या फिरकी गोलंदाजीने २७ बळीही मिळवले आहेत. (Kedar Jadhav Retired)

तर टी-२० क्रिकेटमध्ये फक्त ६ डाव तो खेळला आणि यात त्याने १२२ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक अर्धशतक आहे. ३९ वर्षीय केदार जाधव महेंद्रसिंग धोनीच्या कप्तानीखाली बहराला आला आणि २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक संघाचा तो भाग होता. त्या स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्य फेरीत मजल मारली होती. आक्रमक पण तितकीच शैलीदार फलंदाजी असलेला केदार गरज पडेल तेव्हा चांगली ऑफ-ब्रेक गोलंदाजीही करू शकत होता. (Kedar Jadhav Retired)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.