Khel Ratna Felicitation : मनू, गुकेशला खेलरत्न प्रदान

45
Khel Ratna Felicitation : मनू, गुकेशला खेलरत्न प्रदान
Khel Ratna Felicitation : मनू, गुकेशला खेलरत्न प्रदान
  • ऋजुता लुकतुके

भारताचा नवीन बुद्धिबळ जगज्जेता डी गुकेश तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुहेरी पदकं जिंकणारी मनू भाकेर यांना शुक्रवारी एका विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती भवनात मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानिक करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी दोघांना मानचिन्ह आणि पदक बहाल केलं. गुकेशने अलीकडेच सिंगापूर इथं झालेल्या जगज्जेतेपदाच्या लढतीत चीनच्या डिंग लिरेनला हरवून जगज्जेतेपद पटकावलं होतं. १९ वर्षं आणि १६५ दिवसांच्या गुकेशने जगातील सगळ्यात लहान जगज्जेत्ता होण्याचा मानही मिळवला होता. विश्वनाथन आनंद नंतर जगज्जेतेपद पटकावणारा तो फक्त दुसरा भारतीय ठरला आहे. (Khel Ratna Felicitation)

या त्याच्या कामगिरीचा गौरव खेलरत्न पुरस्कार देऊन करण्यात आला आहे. यंदा बुद्धिबळ ऑलिम्पिया़डमध्ये भारतीय संघाने सुवर्ण जिंकलं. त्यातही गुकेशचा वाटा मोठा होता. त्याच्याशिवाय नेमबाज मनू भाकेरलाही खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर एअर पिस्तुलाच्या एकेरी आणि मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्य जिंकलं. एकाच ऑलिम्पिकमध्ये दुहेरी पदक जिंकणारी मनू ही पहिली भारतीय ठरली आहे. यापूर्वी फक्त पी व्ही सिंधू आणि सुशील कुमार यांनी दोन ऑलिम्पिक पदकं जिंकली आहेत. (Khel Ratna Felicitation)

(हेही वाचा- नाराज Chhagan Bhujbal यांची राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला शिर्डीत हजेरी)

<

मनू आणि गुकेश यांच्याबरोबरच भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅराॲथलीट प्रवीण कुमार यांनाही खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. हरमनप्रीतने टोकयो आणि पॅरिसमध्येही हॉकी संघाचं यशस्वी नेतृत्व केलं. आणि संघाला लागोपाठ दोन हॉकी कांस्य पदकं जिंकून दिली. पॅरिसमध्ये तो सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला होता. तर प्रवीण कुमारने अपंगत्वावर मात करत पॅरिस पॅरालिम्पिक खेळात उंच ऊडी प्रकारात सुवर्ण जिंकलं होतं (Khel Ratna Felicitation)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.