Khel Ratna Snub : हॉकीपटू हरमनप्रीत, दिव्यांग उंच उडी खेळाडू प्रवीण कुमार यांचं खेलरत्नसाठी नामांकन, मनु भाकरचं नाव वगळलं

Khel Ratna Snub : मनू भाकेरने यंदा दोन ऑलिम्पिक पदकं जिंकली आहेत.

30
Khel Ratna Snub : हॉकीपटू हरमनप्रीत, दिव्यांग उंच उडी खेळाडू प्रवीण कुमार यांचं खेलरत्नसाठी नामांकन, मनु भाकरचं नाव वगळलं
  • ऋजुता लुकतुके

भारताच्या अलीकडच्या दोन हॉकी ऑलिम्पिक कांस्य पदकांमध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या हरमनप्रीत सिंगची शिफारस यंदाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी झाली आहे. त्याच्या जोडीला पॅरालिम्पिक उंच उडी खेळाडू प्रवीण कुमारही आहे. पण, आश्चर्य म्हणजे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी पिस्तुल नेमबाज मनु भाकरला खेलरत्न पुरस्कार न मिळाल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. क्रीडा मंत्रालयाच्या मते मनु भाकरने अर्जच केला नाही. तर मनु भाकरच्या वडिलांनी अर्ज केल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे हा वाद येणाऱ्या दिवसांत चिघळताना दिसणार आहे. (Khel Ratna Snub)

खरंतर खेळाडूंनी अर्ज केला नसला तरीही कामगिरीची योग्य दखल घेऊन पुरस्कार देता येतो. यंदा सर्वोच्च न्यायालयाचे जस्टिस रामसुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली १२ जणांची समिती हे काम पाहत होती. गेल्यावर्षी क्रिकेटपटू मोहम्मद शमीने अर्ज न करताही बीसीसीआयने केलेल्या पाठपुराव्यामुळे शमीला हा पुरस्कार देण्यात आला होता. (Khel Ratna Snub)

(हेही वाचा – Boxing Day Test : मेलबर्नची कसोटीतील खेळपट्टी कशी असेल? क्युरेटरने काय सांगितलं?)

पण, पॅरिसमध्ये एकाच ऑलिम्पिकमध्ये दुहेरी पदक जिंकणाऱ्या मनुचा मात्र असा विचार झालेला दिसत नाही. मनुला यापूर्वी २०२० मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता. मनूने यंदा १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात वैयक्तिक आणि मिश्र सांघिक अशा दोन प्रकारात कांस्य जिंकलं. पण, पॅरिसमधून परतल्या परतल्या मनुने सोशल मीडियावरील एका ट्विटमुळे वाद ओढवून घेतला होता. ‘आता सांगा? मला खेलरत्न मिळायला हवं की नाही?’ असं तिने पोस्टमध्ये लिहिलं होतं. (Khel Ratna Snub)

मनुचे वडील राम किशनही सध्या नाराज आहेत. ‘माझ्या मुलीने आणखी काय करायला पाहिजे होतं? तिने देशाला एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकून दिली आहेत. तरीही तिचा विचार खेलरत्नसाठी झाला नाही. मी तिला नेमबाजीत घातलं याचं मला दु:ख होतं. तिला क्रिकेटपटू करायला हवं होतं,’ असं राम किशन मीडियाशी बोलताना म्हणाले. (Khel Ratna Snub)

(हेही वाचा – BMC : महापालिकेचे सहआयुक्त चंद्रशेखर चौरे आणि उपायुक्त चव्हाण सेवानिवृत्तीनंतर बनणार विशेष कार्य अधिकारी)

दरम्यान, खेलरत्नचे दोन विजेते हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यांनी पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. हरमनप्रीतने टोकयोमध्येही भारतीय संधाला कांस्य जिंकून दिलं होतं. यंदा पॅरिसमध्ये सर्वाधिक वैयक्तिक गोल करण्याचा विक्रम त्याच्याच नावावर होता. तर प्रवीणनेही भारताला सलग दुसऱ्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये पदक जिंकून दिलं. टोकयोमध्ये त्याच्या नावावर रौप्य होतं. यावेळी त्याने सुवर्णाची कमाई केली आहे. खेलरत्न पुरस्काराबरोबरच ३० जणांची अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यातील १३ खेळाडू हे पॅराॲथलीट आहेत. कुस्तीपटू अमन सेहरावत हे अर्जुन मिळवणाऱ्यांमधलं प्रसिद्ध नाव आहे. (Khel Ratna Snub)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.