Khel Ratna Snub : मनु भाकरने कबूल केली खेल रत्नासाठी अर्ज करतानाची चूक

Khel Ratna Snub : पुरस्कारांवर नाही, तर कामगिरीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचा निर्वाळा

57
Khel Ratna Snub : मनु भाकरने कबूल केली खेल रत्नासाठी अर्ज करतानाची चूक
Khel Ratna Snub : मनु भाकरने कबूल केली खेल रत्नासाठी अर्ज करतानाची चूक
  • ऋजुता लुकतुके

खेलरत्न पुरस्कारासाठी नेमबाज मनु भाकरला वगळण्यात आल्यामुळे नवीन वाद निर्माण होत असतानाच स्वत: मनु भाकरने समोर येत खेलरत्न पुरस्कारासाठी केलेल्या अर्जातील एक चूक मान्य केली आहे. मनु भाकरने यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पिस्तुल नेमबाजी प्रकारात दोन कांस्य पदकं जिंकली. एकाच स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी मनू पहिली भारतीय ॲथलीट ठरली आहे. त्यामुळे यंदा तिला खेलरत्न पुरस्कार मिळण्याची आशा असतानाच प्रत्यक्षात हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार ही दोन नावं जाहीर झाली. पण, मनु भाकरचं नाव त्याच नव्हतं. मनूचे वडील राम किशन यांनी त्यावर नाराजीही व्यक्त केली. ‘मनूने आणखी काय करायला हवं? मी तिला हा खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यायला नको होतं,’ असं राम किशन मीडियाशी बोलताना म्हणाले. (Khel Ratna Snub)

(हेही वाचा- Ayodhya Ram mandir उभारणीचा ५०० वर्षांचा संघर्ष लवकरच टीव्हीवर; ट्रस्ट बनवत आहे माहितीपट)

त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने सारवासारवही केली. पुरस्कार अजून निश्चित झालेले नाहीत, असं क्रीडा मंत्रालयाकडून सांगितलं गेलं असतानाच मनूने आता सोशल मीडियावर आपली नवीन भूमिका जाहीर केली आहे. ‘खेलरत्न पुरस्कारावरून जो वाद निर्माण झाला आहे त्याबद्दल मला इतकंच सांगायचं आहे की, माझं काम खेळत राहणं हे आहे. आणि देशासाठी चांगली कामगिरी करत राहायची हेच माझं ध्येय आहे. पुरस्कारासाठी मी केलेल्या अर्जात काहीतरी त्रुटी राहिली आहे. आणि ती दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,’ असं मनु भाकरने म्हटलं आहे. (Khel Ratna Snub)

 ‘पुरस्कार आणि सन्मानामुळे मला प्रेरणा नक्कीच मिळते. पण, ते माझं अंतिम ध्येय नाही. मला खेळावरच लक्ष केंद्रीत करायचं आहे,’ असं मनु भाकर म्हणते. पुरस्कारावरून सुरू झालेला वाद बाजूला ठेवून देशासाठी अधिकाधिक पदकं जिंकण्याची ईर्ष्या बाळगून असल्याचं तिने म्हटलं आहे. (Khel Ratna Snub)

(हेही वाचा- ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकाची सुरुवात कशी झाली? आयसीसीच्या या स्पर्धेविषयी जाणून घ्या सर्व काही)

मनु भाकरच्या या भूमिकेनंतरची तिचे प्रशिक्षक जसपाल राणा आणि वडील राम किशन यांनी सरकारवर खेलरत्न पुरस्कारावरून निर्माण केलेल्या वादासाठी ताशेरे ओढले आहेत. मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ३ प्रकारात भाग घेतला होता. यातील १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात तिने वैयक्तिक आणि मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदकं जिंकली. तर ५० मीटर प्रकारात ती चौथी आली. (Khel Ratna Snub)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.