Khelo India Kho Kho : खेलो इंडिया महिला राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रियांका इंगळे महाराष्ट्राची कर्णधार

खेलो इंडिया महिला खो खो लीग स्पर्धा झांसी इथं होणार आहे. 

183
Khelo India Kho Kho : खेलो इंडिया महिला राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रियांका इंगळे महाराष्ट्राची कर्णधार
  • ऋजुता लुकतुके

खेलो इंडिया अंतर्गत आता महिलांची राष्ट्रीय खो को लीगही भरवण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशच्या झांसी इथं १७ ते १९ मार्च दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा महिला संघ सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र खो खो संघटनेचे सरचिटणिस गोविंद शर्मा यांनी हा संघ जाहीर केला. झांसी इथं बुंदेलखंड विदयापीठात युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स ग्राऊंडवर ही स्पर्धा रंगणार आहे. (Khelo India Kho Kho)

महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी पुण्याच्या प्रियांका इंगळे हिची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या संघातील खेळाडूंनी १६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता महाराष्ट्राचा महिला संघ जळगावहून झांसी इथं रवाना होणार आहे. खेळाडूंना यंदा संघटनेकडून मॅट शूज पुरवले जाणार आहेत. स्पर्धा ही मॅटवर आणि शूज घालून होणार आहे. (Khelo India Kho Kho)

निवड झालेल्या महिला संघात कर्णधार प्रियांकासह आणखी पाच खेळाडू हे पुण्याचे आहेत. २ खेळाडू रत्नागिरी, २ ठाणे, ३ धाराशीव तर सांगली, संभाजीनगर आणि सोलापूरची प्रत्येकी एक खेळाडू आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक विकास सूर्यवंशी तर सहाय्यक प्रशिक्षक जयांषू पोळ असतील. लता पोळ या व्यवस्थापिका म्हणून संघाबरोबर असतील. (Khelo India Kho Kho)

(हेही वाचा – Lok Sabha Election : भाजपाची दुसरी यादी तयार, अधिकृत घोषणा लवकरच; महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश)

असा असेल महिला संघ 

महिला संघ : प्रियांका इंगळे (कर्णधार), रितिका राठोड, कोमल दारवटकर, काजल भोर, भाग्यश्री बडे (सर्व पुणे), अपेक्षा सुतार, श्रेया सनगरे (सर्व रत्नागिरी), रेश्मा राठोड (ठाणे), संध्यासुरवसे, किरण शिंदे, प्राची जटनुरे (सर्व धाराशिव), प्रतीक्षा बिराजदार (सांगली), प्राजक्ता बनसोडे (सोलापूर), दिव्या बोरसे (छ. संभाजीनगर), कल्याणी कंक (ठाणे) (Khelo India Kho Kho)

प्रशिक्षक : विकास सूर्यवंशी (छ. संभाजीनगर), सह. प्रशिक्षक : जयांषु पोळ (जळगाव), व्यवस्थापिका : लता पोळ (जळगाव). (Khelo India Kho Kho)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.