ऋजुता लुकतुके
नवी दिल्लीत रंगलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय पॅरा गेम्सची (Khelo India Para Games) सांगता क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थिती रविवारी झाली. या स्पर्धेत हरयाणाच्या पॅरा ॲथलीट्सनी अव्वल कामगिरी करताना ४० सुवर्ण, ३९ रौप्य आणि २५ कांस्य पदकं जिंकत एकूण १०५ पदकं पटकावली. उत्तर प्रदेशचा चमू दुसरा तर तामिळनाडू संघ तिसरा आला.
अलीकडेच चीनच्या होआंगझाओ इथं झालेल्या आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा जागवलेले स्टार भारतीय पॅरा ॲथलीट (Khelo India Para Games) राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यामुळे देशवासीयांना त्यांचा खेळ बघायला मिळाला. दोन्ही हात नसताना तिरंदाजी करणारी आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेली शीतल देवी थाळीफेकपटू योगेश कथुनिया, टेबलटेनिसपटू भाविना पटेल, पारुल परमार आणि निशाद पटेल असे अनुभवी पॅरा ॲथलीट स्पर्धेत खेळले.
From facing polio at 1️⃣ to perfect smashes on the 🏓 court, Bhavina Patel’s life story is a 🥇journey that inspires the whole squad!
👀 her rise from adversity to victory, serving inspiration and rewriting the game! 🇮🇳#KheloIndiaParaGames#KheloIndia#Praise4Para pic.twitter.com/73R6rnGFVU
— Khelo India (@kheloindia) December 17, 2023
स्पर्धेचा समारोप क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. ‘आज आपण फक्त पदकांचा सन्मान करत नाही आहोत. तर या खेळाडूंची जिद्द आणि हार न मानण्याच्या वृत्तीला सलाम करत आहोत. या सभागृहात अशा काही कहाण्या आहेत ज्या जगाला ठाऊक नाहीत. पण, सांगण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेला लढाऊ नवा भारत माझ्यासमोर आहे,’ असं ठाकूर खेळाडूंचा गौरव करताना म्हणाले.
क्लब फेक प्रकारात हरयाणाच्या प्रणव सुरमाने नवा आशियाई पातळीवरील पॅरा विक्रम स्थापित केला. ३३.५४ मीटरच्या क्लबफेकीनं त्याने धरमवीर यांनी पूर्वी केलेला आशियाई विक्रम मोडीत काढला. यंदा या सोहळ्याला मेरी कोम, अंजू बॉबी जॉर्ज, अंजुम मुदगिल, हरभजन सिंग, मनू भाकर, विरेन रस्किना आणि अजय जाडेजा या खेळाडूंनी हजेरी लावली.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community