ऋजुता लुकतुके
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुक्रवारी (१९ जानेवारी) युवा खेलो इंडिया स्पर्धांचं चेन्नईत उद्घाटन (Khelo India Youth Games) झालं. यावेळी बोलताना मोदींनी २०२९ चं युवा ऑलिम्पिक आणि २०३६ चं उन्हाळी ऑलिम्पिक भरवण्यासाठी केंद्रसरकार कटीबद्ध असल्याचं सांगितलं. तसंच नवीन वर्षाची सुरूवात युवा खेळांनी होतेय हे सकारात्मक लक्षण असल्याचंही ते म्हणाले.
(हेही वाचा – Rahul Gandhi यांच्या अडचणीत वाढ; मानहानीच्या दाव्यात तपास करण्याचे न्यायालयाचे आदेश)
मशाल प्रज्वलित करून शुभारंभ –
‘एक भारत, श्रेष्ठ भारत,’ या उक्तीचा त्यांनी पुनरुच्चार केला. पारंपरिक पद्धतीने युवा खेलो इंडियाची (Khelo India Youth Games) मशाल प्रज्वलित करून त्यांनी खेळांचा शुभारंभ केला. येत्या काही वर्षांत भारतीय क्रीडा क्षेत्राचं मूल्यांकन १ लाख कोटी रुपयांपर्यंत जाईल असा आशावादही त्यांनी जागवला.
It is a matter of great joy that Khelo India Youth Games are being held in the beautiful city of Chennai. These games will help nurture young sporting talent. https://t.co/jVdVNxrY44
— Narendra Modi (@narendramodi) January 19, 2024
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?
तामिळनाडूतील लोकांचं आदरातिथ्य तुमची मनं जिंकेल, असं मोदी यावेळी बोलताना म्हणाले. युवा खेलो इंडियातून (Khelo India Youth Games) भावी काळात ऑलिम्पिक स्टार तयार होणार असल्यामुळे या खेळांना हलकं लेखू नका असंही ते म्हणाले. ‘मोठ्या स्तरावर मल्टी स्पोर्ट स्पर्धा भरवणं हे देशाच्या क्रीडा विकासासाठी आवश्यक आहे. आणि त्यातून देशात क्रीडा निपुण खेळाडू तयार होऊन क्रीडा संस्कृती तयार होणार आहे. आणि त्यातूनच हळू हळू जागतिक स्तरावर भारत एक क्रीडामहाशक्ती म्हणून उदयाला येईल,’ असं नरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणाले. (Khelo India Youth Games)
(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : पुणेकरांनो, जगातील सर्वात मोठ्या दीपोत्सवात सहभागी व्हा)
यंदाच्या १३व्या खेलो इंडिया युवा स्पर्धा असून सर्व ३६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून एकूण ५,००० च्या वर खेळाडू यंदा यात सहभागी होणार आहेत.
उद्घाटन सोहळ्यासाठी (Khelo India Youth Games) तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, क्रीडाराज्यमंत्री नितिश प्रामाणिक व माहिती व प्रसारणमंत्री एल मुरुगन उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community