Kho Kho World Cup : खो-खो विश्वचषकात भारताचे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीत; भूतान, नेपाळ, केनियाचे प्रभावी विजय

Kho Kho World Cup : महाराष्ट्राचा अनिकेत मोटे आतापर्यंत सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे. 

35
Kho Kho World Cup : खो-खो विश्वचषकात भारताचे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीत; भूतान, नेपाळ, केनियाचे प्रभावी विजय
  • ऋजुता लुकतुके

इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय महिला संघाने आपला अपराजित राहण्याचा धडाका कायम ठेवत इराणला अक्षरशः लोळवल. दक्षिण कोरियाविरुद्धच्या ऐतिहासिक १७५-१८ अशा विजयानंतर, भारतीय महिला खो-खो संघाने इराणला ८४ गुणांनी पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. भारतीय संघाने सलग दुसऱ्या सामन्यात १०० च्या वर गुण कमावले.

आम्हाला फक्त जिंकायचे नसून खो-खो जगावर निर्वविवाद वर्चस्व निर्माण करायचं असल्याचे सांगितले. या सामन्यात भारतीय खो-खो खेळाडूंनी इराणच्या खेळाडूंना पळता भुई थोडी केली. यापूर्वी भारताने मध्यंतराला ५२-१० अशी घसघशीत आघाडी घेत विजयी घोडदौड कुठेही थांबणार नाही याची काळजी घेतली. बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात भारतीय महिलांनी १००-१६ असा मोठा विजय मिळवला. या कामगिरीने त्यांना गटात अव्वल स्थान मिळवून दिले आहे. (Kho Kho World Cup)

(हेही वाचा – शहर फेरीवालेमुक्त करण्यात मुंबई महापालिका अपयशी; Bombay High Court चे ताशेरे)

सामन्याची सुरुवात भारतीय संघाच्या नेहमीच्या आक्रमक शैलीने झाली. पहिल्या टर्नमध्ये त्यांनी इराणच्या पहिल्या बॅचला अवघ्या ३३ सेकंदांत बाद केले. अश्विनीने आघाडी घेत संघासाठी सुरुवातीलाच गुण मिळवले, तर मीनूने आपला शानदार फॉर्म कायम राखत अनेक सहज स्पर्शाने गुण मिळवले. पहिल्या टर्नमध्येच भारतीय संघाने ५० गुणांची कमाई केली.

सामना पुढेही एकतर्फी राहिला. तिसऱ्या टर्नच्या शेवटी भारताचे ९३ गुण झाले होते व शेवटच्या टर्न मध्ये ७ ड्रीम रन वसूल करत भारताने गुणांची शंभरी गाठली. वझीर निर्मलाच्या डावपेचांच्या कौशल्याने आणि कर्णधार प्रियांका इंगळे, निर्मला भाटी आणि नसरीन यांच्या योगदानामुळे भारताने आणखी एक प्रभावी व मोठा विजय साजरा केला. या विजयामुळे भारताने या स्पर्धेतील विजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. (Kho Kho World Cup)

(हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहला सक्तीची विश्रांती

सामन्यातील पुरस्कार :

सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू : मोबिना (इराण)

सर्वोत्कृष्ट बचावपटू : मीनू (भारत)

सामन्याची उत्कृष्ट खेळाडू : प्रियांका इंगळे (कर्णधार-भारत)

केनियाची ऑस्ट्रेलियावर निसटती मात

पुरुष गटातील एका चुरशीच्या सामन्यात केनियाने ऑस्ट्रेलियावर ५८-५४ अशी मात केली. मध्यंतरास ऑस्ट्रेलियाने केनियावर २८-२६ असे निसटती आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र केनियाने बहारदार खेळी करीत संघाचा विजय खेचून आणला. किनियाचा मोसेस अटेन्या (१.२३ मि. संरक्षण व १४ गुण ) याने अष्टपैलू खेळी केली. ऑस्ट्रेलियाचा मंगेश जगताप आक्रमक पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने यात १२ गडी टिपले. सकाळी झालेल्या सामन्यात मंगेशने जर्मनी विरुद्धही आक्रमकचा पुरस्कार तर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू खेळाडूचा मान मिळविला होता. (Kho Kho World Cup)

(हेही वाचा – Ladki Bahin Yojna मूळे राज्य शासनावर कोणताही आर्थिक बोजा नाही; महायुती सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती)

स्पर्धेतील अन्य निकाल :

पुरुष : इंग्लंड विजयी विरुद्ध मलेशिया ५२-३२.

महिला : न्युझीलंड विजयी विरुद्ध पेरू ६६-२६.

भूतान विजयी विरुद्ध जर्मनी ६६-२२.

दक्षिण आफ्रिका विजयी पोलंड ७८-२.

नेपाळ विजयी विरुद्ध जर्मनी ७३-३४.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.