Kho-Kho World Cup : पुढचा खो-खो विश्वचषक भारताबाहेर बर्मिंगहॅममध्ये होणार आयोजित

Kho-Kho World Cup : खो-खो खेळ भारताबाहेर युरोपात पोहोचणार आहे. 

27
Kho-Kho World Cup : पुढचा खो-खो विश्वचषक भारताबाहेर बर्मिंगहॅममध्ये होणार आयोजित
  • ऋजुता लुकतुके

पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेचं आयोजन यशस्वी झाल्यानंतर ही स्पर्धा नियमितपणे घेण्याचा निर्धार आंतरराष्ट्रीय खो-खो संघटनेनं जाहीर केला आहे आणि त्याचबरोबर स्पर्धा भारताबाहेर युकेमध्ये नेण्याची घोषणाही केली आहे. आंतरराष्ट्रीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी २०२७ आली दुसऱ्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान पद इंग्लंडला दिल्याचे जाहीर केले. सदर स्पर्धा बर्मिंगहॅम, इंग्लंड इथं आयोजित केली जाणार आहे. (Kho-Kho World Cup)

भारतीय संघाने पुरुष आणि महिला या दोन्ही गटात विश्वविजेतेपद जिंकल्याने भारतभर जल्लोष होत आहे. पहिल्या विश्वचषक स्पर्धेच्या सामोरोपानंतर पत्रकार परिषदेत आयोजित केली होती. यावेळी आंतरराष्ट्रीय व भारतीय खो-खो महासंघाचे सरचिटणीस (तांत्रिक) एम. एस. त्यागी, आंतरराष्ट्रीय खो-खो फेडरेशनचे सरचिटणीस रोहित हल्दानिया, इज माय ट्रिपचे वीरेंद्र कुमार, केकेडब्ल्यूसीचे सीईओ मेजर जनरल विक्रम देव डोग्रा आणि विश्वचषक विजेते संघाचे दोन्ही कर्णधार प्रतीक वाईकर आणि प्रियांका इंगळे उपस्थित होते. (Kho-Kho World Cup)

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : भारतीय संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव छापण्यास अखेर बीसीसीआयची परवानगी)

केकेएफआयचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडे ट्रॉफी सुपूर्द करताना कर्णधारांनी विजयाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. या स्पर्धेचे आयोजन करून खेळाला जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत केल्याबद्दल दोन्ही संघांचे प्रशिक्षक सुमित भाटिया, डॉ. मुन्नी जून (महिला संघ) आणि अश्वनी शर्मा (पुरुष संघ) महासंघाचे आभार मानले. (Kho-Kho World Cup)

पत्रकारांना संबोधित करताना अध्यक्ष सुधांशू मित्तल म्हणाले, “ पहिली विश्वचषक खो-खो स्पर्धा खूप यशस्वी ठरली. पुढील खो खो विश्वचषक २०२६-२७ मध्ये बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे होणार असल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. दुसरी स्पर्धा पहिल्यापेक्षा मोठी आणि सर्व अपेक्षा पार करणारी व अधिक आनंद देणारी ठरेल” ते पुढे म्हणाले, “आंतरराष्ट्रीय खो-खो फेडरेशनचे पुढील अधिवेशन देखील १७ एप्रिल रोजी होणार आहे, ज्यात पुढील चार वर्षांच्या रणनीतीवर चर्चा केली जाईल आणि औपचारिकता ठरविली जाईल.” (Kho-Kho World Cup)

(हेही वाचा – सैफ अली खानवर झालेला हल्ला खरा की अभिनय ? मंत्री Nitesh Rane यांचा तिखट सवाल)

पुढील खो-खो विश्वचषक स्पर्धेचे ठिकाण जाहीर करताना मित्तल यांनी विश्वचषकाच्या यशाबद्दल विविध राजकारणी आणि मान्यवरांनी अभिनंदन केल्याचा खुलासाही केला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचा समावेश असल्याचे सांगितले. (Kho-Kho World Cup)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.