- ऋजुता लुकतुके
खो-खो विश्वचषकाच्या यशस्वी आयोजनानंतर भारताने आता खोखोला जगभरात पोहोचवण्याची तयारी चालवली आहे. विशेष म्हणजे आशियाई क्रीडास्पर्धा आणि २०३६ च्या ऑलिम्पिकमध्ये समावेशासाठी भारत प्रयत्न करणार असल्याचं आता क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनीही जाहीर केलं आहे. अर्थातच, पहिला टप्पा आशियाई खेळांचा असणार आहे आणि नंतर भारताला २०३६ च्या ऑलिम्पिकचं यजमानपद मिळालं तर आयोजकांच्या पसंतीच्या खेळात खो-खोचा समावेश करण्याचाही केंद्र सरकारचा प्रयत्न असेल. (Kho-Kho World Cup)
‘भारताने खो-खो विश्वचषकाच्या आयोजनात कसूर सोडली नाही. आता खेळाडूंना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी खो-खो खेळाचा प्रसार आंतरराष्ट्रीय स्तरावर होईल याची काळजी भारत सरकार घेणार आहे. पहिला टप्पा आशियाई खेळ असू शकतो. त्यानंतर ऑलिम्पिकसाठीही प्रयत्न करता येईल,’ असं मांडवीय यांनी स्पष्ट केलं आहे. (Kho-Kho World Cup)
(हेही वाचा – Balasaheb Thackeray यांना भारतरत्न द्यावा; संजय राऊत यांची मागणी)
२०२६ च्या ऑलिम्पिकसाठी भारताने आयोजनासाठी दावेदारी केली आहे. नवी दिल्ली हे शहरही त्यासाठी निश्चित करण्यात आलं आहे. भारताला यजमानपद मिळाल्यास आयोजकांच्या पसंतीचे म्हणून ६ खेळ भारताला समाविष्ट करता येतील. त्यासाठी भारताने खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ, स्कॉश आणि टी-२० क्रिकेट या खेळांचा पर्याया दिला आहे. देशातील पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्याचा भारताचा प्रयत्न आहे आणि हे खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचाही पंतप्रधान मोदी यांचा प्रयत्न असल्याचं मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. (Kho-Kho World Cup)
नुकत्याच, नवी दिल्लीत झालेल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत पुरुष व महिला गटांत अनुक्रमे ३६ व २८ संघ सहभागी झाले होते आणि भारताने दोन्ही गटात विजेतेपद पटकावलं आहे. शिवाय आयोजनही यशस्वी करून दाखवलं. (Kho-Kho World Cup)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community