- ऋजुता लुकतुके
खो-खो विश्वचषक २०२५ (Kho Kho World Cup) मध्ये भारतीय महिला संघांने शतकी गुणांचा चौकार मारत बांगलादेशाचा पाडाव केला. भारतीय महिलांचे आक्रमण इतके जोरदार होते की, सुरुवातीपासूनच बांगलादेश संघाचा निभाव लागला नाही. त्यातच प्रेक्षकांनी ढोल – ताशाचा गरज सुरू ठेवला होता. भारताकडून कर्णधार प्रियंका इंगळेनं (Priyanka Ingale) त्यापुढे बगलादेशाचा सहज पाडाव होणार हे लक्षात आल्याने प्रेक्षकांनी सुरवातीपासूनच ढोल ताशांचा नगारा वाजवणे सुरु होते. भारताची कर्णधार प्रियांका इंगळेने तब्बल ५ मिनिटं ३६ सेकंदं बचाव केला. तिला रेश्मा राठोडने व नसरीन शेखने मोलाची साथ दिल्याने बांगलादेशला पळता भूई थोडी झाली.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम आक्रमण स्वीकारले होते. कर्णधाराने घेतलेला निर्णय सार्थ ठरवताना भारताने ५० गुणांची कमी केली. तर संरक्षणात ६ ड्रीम रान मिळवत मध्यंतराला ५६-०८ अशी मोठी आघाडी घेतली होती. तर मध्यंतरानंतर तोच धडाका कायम राखत भारताने बांगलादेशचा १०९-१६ असा ९३ गुणांनी धुव्वा उडवत खो-खो विश्वचषक २०२५ (Kho Kho World Cup) च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
(हेही वाचा – केईएम रुग्णालयाचे शताब्दी वर्ष समाज उपयोगी ठरावे – CM Devendra Fadnavis)
सामन्यातील पुरस्कार
सामन्यातील सर्वोत्तम आक्रमक: मगई माझी (भारत)
सामन्यातील सर्वोत्तम संरक्षक: ऋतुराणी सेन (बांगलादेश)
सामन्याची उत्कृष्ट खेळाडू: अश्विनी शिंदे (भारत)
तर भारताच्या पुरुष संघाने सुध्दा महिलांपाठोपाठ गुणांचे शतक करत मोठा विजय साजरा केला. या सामन्यात भारताने श्रीलंकेवर १००-४० (मध्यंतर ५८-१८) असा ६० गुणांनी चमकदार विजयाची नोंद केली व उपांत्य फेरीत धडक मारली. रामजी कश्यप, प्रतीक वाईकर, आणि आदित्य गणपुले यांच्या अप्रतिम कामगिरी भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. रामजी कश्यप या सामन्यात सामन्याचा मानकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. भारताच्या दोन्ही संघाची उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेशी (South Africa) लढत होईल.
(हेही वाचा – Mahakumbh 2025 : महाकुंभात स्फोटाची धमकी; 18 संशयित ताब्यात, संरक्षण मंत्री लष्कराच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार)
इतर उपांत्य फेरी निकाल
महिला गट:
उगांडाने न्यूझीलंडचा ७१-२६ ने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
दक्षिण आफ्रिकेने केनियाचा ५१-४६ च्या निसटत्या फरकाने पराभव केला.
नेपाळने इराणचा १०३-८ ने धुव्वा उडवला.
पुरुष गट:
इराणने केनियाला ८६-१८ ने पराभूत केले.
दक्षिण आफ्रिकाने इंग्लंडचा ५८-३८ ने विजय मिळवला.
नेपाळने बांगलादेशचा ६७-१८ ने सहज पराभव केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community