Kirsty Coventry : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नवीन अध्यक्ष कर्स्टी कोव्हेंट्री कोण आहेत?

Kirsty Coventry : त्या आयओसीच्या पहिल्या महिला आणि वयाने सगळ्यात लहान अध्यक्ष असतील.

52
Kirsty Coventry : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नवीन अध्यक्ष कर्स्टी कोव्हेंट्री कोण आहेत?
  • ऋजुता लुकतुके

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची अध्यक्ष म्हणून कर्स्टी कॉव्हेंट्री (Kirsty Coventry) यांची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातला हा ऐतिहासिक बदल आहे. कारण, आयओसीचं नेतृत्व पहिल्यांदा एक महिला करणार आहे. तसंच त्या वयाने सगळ्यात लहान अध्यक्ष असतील. मागची १२ वर्षं आयओसीची धुरा सांभाळल्यानंतर थॉमस बाख यांनी यंदा निवृत्ती पत्करली आहे. त्यानंतर ४१ वर्षीय आफ्रिकन नागरिक कर्स्टी यांच्याकडे ऑलिम्पिक समितीची धुरा आली आहे.

(हेही वाचा – Sanatan Sanstha : गोव्यात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ मध्ये किमान 20 हजारांची असणार उपस्थिती)

कॉव्हेंट्री (Kirsty Coventry) या स्वत: दोनदा ऑलिम्पिक विजेत्या राहिल्या आहेत. निवडणुकीच्या पहिल्याच फेरीत त्यांनी संभाव्य विजेतेपदाचे उमेदवार आणि जागतिक ॲथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष सॅवेस्टियन को यांना हरवलं होतं. तर जागतिक क्रीडा क्षेत्रात संघटक म्हणून मोठं नाव असलेले युआन अँटोनिओ समरांच ज्युनिअर यांचाही त्यांनी पराभव केला होता. त्यांचा विजय अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. पण, ऑलिम्पिक चळवळीत त्यांना असलेला पाठिंबाही त्यामुळे अधोरेखित झाला. खुद्द मावळते अध्यक्ष थॉमस बाख यांनीही कॉव्हेंट्री (Kirsty Coventry) यांनाच आपला पाठिंबा दिल्याचंही नंतर उघड झालं. त्यामुळे त्यांचा विजय ही एक औपचारिकता उरली होती. ‘माझ्यासाठीही हा एक ऐतिहासिक क्षण आहे. ज्या खेळाने मला मोठं केलं, त्याला काहीतरी मी देणं लागते. आणि ते परत देण्याची संधी मला यातून मिळणार आहे. ऑलिम्पिक चळवळीवर माझा नितांत विश्वास आहे,’ असं कॉव्हेंट्री यांनी बोलून दाखवलं आहे.

(हेही वाचा – न्यायाधीशांच्या घरात सापडलं घबाड ; Supreme Court ने दिले चौकशीचे आदेश)

कर्स्टी कॉव्हेंट्री (Kirsty Coventry) ही झिंबाब्वेची लोकप्रिय आणि प्रसिद्ध क्रीडापटू आहे. तिच्या खात्यात २००४ आणि २००८ मध्ये तिने जलतरणात एकूण ७ ऑलिम्पिक पदकं जिंकली आहेत. यातील दोन सुवर्ण आहेत. २०१८ ते २०२१ या कालावधीत कर्स्टी ऑलिम्पिक समितीच्या ॲथलेटिक्स विभागात कार्यरत होती. खेळांमधून तरुणांचा विकास साधण्याचं तिचं ध्येय आहे. आणि थॉमस बाख यांच्या काळात हाती घेतलेले काही प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला आहे.

(हेही वाचा – IPL 2025 : कोलकाता वि. लखनौ सामना आता गुवाहाटीत)

ऑलिम्पिक समितीला पहिल्यांदाच आफ्रिका खंडातील नेतृत्व लाभलं आहे. त्यामुळे लिंग समानता आणि प्रादेशिक प्रतिनिधित्व या मुद्यांवर तिची निवड महत्त्वाची मानली जात आहे. २०२८ च्या ऑलिम्पिकचं आयोजन हे तिच्या समोरचं पहिलं मोठं आव्हान असणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.