Kiwi PM Plays Cricket : किवी पंतप्रधान जेव्हा दिल्लीच्या रस्त्यावर कपिल देवबरोबर क्रिकेट खेळतात

Kiwi PM Plays Cricket : ख्रिस्तोफर लक्सन सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.

64
Kiwi PM Plays Cricket : किवी पंतप्रधान जेव्हा दिल्लीच्या रस्त्यावर कपिल देवबरोबर क्रिकेट खेळतात
  • ऋजुता लुकतुके

अधिकृत भारत भेटीवर आलेले न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी नवी दिल्लीत चक्क गल्ली क्रिकेटचा आनंद लुटला. त्यांच्याबरोबर न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू रॉस टेलरही होते आणि भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांनी सामन्यात पंचाची भूमिका निभावली. लक्सन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान घाईघाईने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज इजाज पटेलही यात सामील झाला. पंतप्रधान ख्रिस्तोफर म्हणाले की, क्रिकेट दोन्ही देशांमधील मैत्री आणि विश्वास वाढवण्यासाठी एक पूल म्हणून काम करते. (Kiwi PM Plays Cricket)

(हेही वाचा – Narco Terrorism देशासाठी धोकादायक; तरुण पिढीचे रक्षण करण्याची गरज; समीर वानखेडे यांनी केले प्रबोधन)

न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर भारतासोबत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यासाठी भारत दौऱ्यावर आले आहेत. या काळात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. या करारामुळे पुढील दहा वर्षांत दोन्ही देशांमधील व्यापार १० पट वाढण्याची अपेक्षा आहे. आर्थिक संबंध वाढवण्यासाठी मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याची घोषणा दोन्ही देशांनी १६ मार्च रोजी केली. रस्त्यावर मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा हा कार्यक्रम देखील दोन्ही पंतप्रधानांच्या बैठकीत निश्चित करण्यात आला. (Kiwi PM Plays Cricket)

(हेही वाचा – शासकीय रुग्णालयात कर्तव्यावर उपस्थित नसणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होणार; मंत्री Sanjay Shirsat यांचे निर्देश)

न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनीही दिल्लीतील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराला भेट दिली. ते म्हणाले, ‘न्यूझीलंडमधील हिंदू समुदायाने आपल्या देशासाठी खूप काही केले आहे. आज दिल्लीत मी अनेक किवी-हिंदूंसाठी असलेल्या या पवित्र ठिकाणी आदरांजली वाहिली. न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू रॉस टेलर यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण ४५० सामने खेळले आहेत. त्यांनी सर्व फॉरमॅटमध्ये एकूण २८ हजार २८९ धावा केल्या आहेत. यामध्ये ४० शतके आणि ९५ अर्धशतकांचा समावेश आहे. (Kiwi PM Plays Cricket)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.