KKR vs SRH Final: आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी चेन्नईत मुसळधार पाऊस, खेळाडूंची धावाधाव

160
KKR vs SRH Final: आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी चेन्नईत मुसळधार पाऊस, खेळाडूंची धावाधाव
KKR vs SRH Final: आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी चेन्नईत मुसळधार पाऊस, खेळाडूंची धावाधाव

आयपीएलच्या 17 व्या हंगमातील अंतिम सामन्यासाठी (KKR vs SRH Final) पूर्ण तयारी झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या संघांमध्ये किताबी लढत होणार आहे. अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे होणार आहे. या अंतिम सामन्यासाठी (IPL 2024) क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अशात दोन्ही संघांसाठी आणि क्रिकेट चाहत्यांसाठी चेपॉकमधून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. (KKR vs SRH Final)

खेळाडूंच्या सरावावर पाणी फेरलं

अंतिम सामन्याच्या (KKR vs SRH Final) पूर्वसंध्येला कोलकाताच्या खेळाडूंचा चेपॉक स्टेडियममध्ये जोरदार सराव करत होते. अशात पावसाने एन्ट्री घेतली. अचानक आलेल्या पावसामुळे नेट्स प्रॅक्टीस करणाऱ्या केकेआरच्या खेळाडूंची एकच धावाधाव झालेली पाहायला मिळाली. एकाएकी आलेल्या पावसाने केकेआरच्या खेळाडूंच्या सरावावर पाणी फेरलं. केकेआर खेळाडूंनी जे मिळेल ते घेऊन ड्रेसिंग रुमच्या दिशने धुम ठोकली. तर दुसऱ्या बाजूला ग्राउंड स्टाफ कव्हर्स घेत खेळपट्टी झाकण्यासाठी धावत गेले. (KKR vs SRH Final)

पावसामुळे चाहत्यांची चिंता वाढली

आता या पावसामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. सामन्याच्या दिवशीही पावसाने हजेरी लावल्यास चाहत्यांचा हिरमोड होणार हे निश्चित आहे. आयपीएलच्या 16 व्या मोसमातील अंतिम सामन्यातही पावसाने विघ्न घातलं होतं. त्यामुळे आता या हंगामातील अंतिम सामन्यातही गेल्या मोसमाप्रमाणे पावसाने विघ्न घालू नये, इतकीच अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना आहे. (KKR vs SRH Final)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.