-
ऋजुता लुकतुके
नेदरलँड्स विरुद्ध भारताच्या पहिल्या ५ फलंदाजांनी किमान ५० धावा केल्या. यात के एल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी शतकं ठोकली. राहुलचं शतक घणाघाती होतं आणि यात त्याने जुने विक्रमही मोडले. (Ind vs Ned)
आपल्या घरच्या मैदानावर खेळताना भारताचा यष्टीरक्षक फलंदाज के एल राहुलने तडाखेबंद शतक झळकावलं. शेवटच्या षटकांत त्याने श्रेयस अय्यरच्या बरोबरीने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने ४०० धावांचा टप्पा ओलांडला. श्रेयस बरोबर चौथ्या गड्यासाठी २०६ धावांची भागिदारी करताना राहुलने स्वत: १०३ धावा केल्या. (Ind vs Ned)
जच तेज गोलंदाज बास दी लीडला लागोपाठच्या चेंडूंवर षटकार लगावत त्याने शतक पूर्ण केलं ते ६२ चेंडूंमध्ये आणि ते करताना भारतातर्फे सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. हा विक्रम आधी रोहित शर्माच्या नावावर होता. (Ind vs Ned)
The local lad wows Chinnaswamy! 💯
A magnificent CENTURY that from KL Rahul 👏👏#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvNED pic.twitter.com/u47WSKzrXG
— BCCI (@BCCI) November 12, 2023
याच स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्ध रोहित शर्माने ६३ चेंडूत शतक ठोकलं होतं. रविवारी नेदरलँड्स विरुद्ध के एल राहुलने ६२ व्या चेंडूवर आपलं शतक पूर्ण केलं. यात त्याने ११ चौकार तर ४ षटकार ठोकले आणि त्याचा स्ट्राईकरेट होता १५९ धावांचा. (Ind vs Ned)
(हेही वाचा – GMail Account : जर तुम्ही बरेच दिवस तुमचे मेल तपासले नसतील तर… गुगलने घेतला मोठा निर्णय)
आतापर्यंत या स्पर्धेत के एल राहुलने ९ सामन्यांमध्ये ३४७ धावा केल्या आहेत त्या ६९ धावांच्या सरासरीने आणि यात त्याने एक शतक तर एक अर्धशतक ठोकलं आहे. विराट कोहली (५९४ धावा), रोहित शर्मा (५०३) आणि श्रेयस अय्यर (४२१) यांच्या पाठोपाठ राहुल भारताचा सर्वाधिक यशस्वी फलंदाज आहे. त्याचं रविवारचं शतक हे या स्पर्धेतील पाचवं वेगवान शतक ठरलं आहे. (Ind vs Ned)
तर कॅलेंडर वर्ष २०२३ मध्ये राहुलने २० डावांमध्ये ८७८ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ६७ धावांची आहे. तर सर्वाधिक धावसंख्या आहे नाबाद १११. भारतीय संघातील मधल्या फळीचा तो भरवशाचा फलंदाज मानला जातो. (Ind vs Ned)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community