- ऋजुता लुकतुके
के एल राहुलने (KL Rahul) अलीकडे दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कसोटी मालिकेत पाचव्या क्रमांकावरील फलंदाजांबरोबरच यष्टीरक्षणाची जबाबदारीही पार पाडली. भारताच्या तेज चौकडीसमोर यष्टीमागे त्याची कामगिरीही उजवी होती. तसंच डीआरएस विषयीचे महत्त्वाचे निर्णय घेतानाही कर्णधार रोहितला (Captain Rohit) त्याने मोलाची मदत केली. (India vs England Test Series)
पण, आता इंग्लंड विरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत राहुल यष्टीरक्षण करणार नाही, असं खात्रीलायकरित्या समोर येत आहे. २५ जानेवारीपासून हैद्राबाद इथं इंग्लंडविरुद्धची मालिका सुरू होत आहे. आणि या मालिकेतील पहिल्या दोन कसोटींसाठी भारतीय संघात राहुल बरोबरच कोना भरत आणि ध्रुव जेरेल या दोन यष्टीरक्षकांचीही निवड करण्यात आली आहे. निवड समितीची पहिली पसंती कोना भरतला असल्याचं आता बोललं जात आहे. (India vs England Test Series)
त्यामुळे राहुल संघात फलंदाज म्हणून खेळेल आणि यष्टीरक्षणाची जबाबदारी भरत किंवा फारतर ध्रुववर सोपवली जाईल, असं बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे. (India vs England Test Series)
‘परदेशातील कसोटीत यष्टीरक्षण करतानाची गोष्ट वेगळी असते. तिथे यष्टीच्या खूप मागे राहून तुम्हाला काम करायचं असतं. भारतात फिरकीला पोषक वातावरणात यष्टीरक्षण करणं ही खूपच वेगळी गोष्ट आहे. त्यासाठी त्याच कामात तरबेज असलेला यष्टीरक्षक हवा. कारण, फिरकी गोलंदाजांचा चेंडू अचानक वळतो, तो कमी-जास्त उसळी घेतो. यष्टीरक्षकाला जवळ उभं राहून वर खाली बसणे आणि उठणे अशा हालचाली वारंवार कराव्या लागतात. त्यासाठी तज्ज यष्टीरक्षकच बरा,’ असं सूत्रांनी बोलून दाखवलं. (India vs England Test Series)
उलट निवड समितीला राहुल हा भरवशाचा मधल्या फळीतील फलंदाज वाटतो. दक्षिण आफ्रिकेतील कठीण अशा सेंच्युरियन खेळपट्टीवरही राहुलने १०१ धावा केल्या होत्या. आणि आता इंग्लंड विरुद्धही त्याने फलंदाज म्हणून लक्ष केंद्रीत करावं असं बीसीसीआयलाही वाटतं. (India vs England Test Series)
त्यामुळे यष्टीरक्षणाची जबाबदारी कोना भरतवर येऊ शकते. भरत यापूर्वी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत भारताकडून खेळला होता. आणि साऊदॅम्पटन कसोटीत त्याने दुसऱ्या डावात २३ धावाही केल्या होत्या. भारताकडून कोना भरत आतापर्यंत ५ कसोटी खेळला आहे. आणि यात त्याने १८ धावांच्या सरासरीने १२९ धावा केल्या आहेत. (India vs England Test Series)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community