Kushti Olympic Quota : ऑलिम्पिकसाठी निवड चाचणी नाही, कोटा मिळवलेले खेळाडूच पॅरिसला जाणार

Kushti Olympic Quota : भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष संजय सिंग यांनी अखेर निवड चाचणी रद्द केली आहे. 

198
Kushti Olympic Quota : ऑलिम्पिकसाठी निवड चाचणी नाही, कोटा मिळवलेले खेळाडूच पॅरिसला जाणार
  • ऋजुता लुकतुके

भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष संजय सिंग यांनी अखेर ऑलिम्पिक कोटा मिळालेलेच खेळाडू पॅरिसला जाणार असल्याचं जाहीर करुन टाकलं आहे. त्यामुळे ऑलिम्पिकसाठीचा संघ निवडण्यासाठी चाचणी स्पर्धा होईल का, या प्रश्नावरच आता पडदा पडला आहे. अलीकडेच संजय सिंग यांनी निवड चाचणी स्पर्धा घेण्याचं सुतोवाच केलं होतं. (Kushti Olympic Quota)

त्यानंतर या चाचणीची तारीख जाहीर होत नव्हती. त्यामुळे ऑलिम्पिक पात्रता मिळालेली कुस्तीपटू विनेश फोगाटने कुस्ती संघटनेला पत्र लिहून निवड चाचणीची तारीख, वेळ, ठिकाण याची स्पष्टता खेळाडूंना द्यावी अशी विनंती केली होती. तर अलीकडेच ऑलिम्पिक पात्रता मिळवलेल्या निशा आणि रितिका या दोन कुस्तीपटूंनी पत्र लिहून ऐनवेळी निवड चाचणी स्पर्धा घेऊ नये, अशी विनंती केली होती. खेळाडूंनी ही पत्र लिहिताना ऑलिम्पिक असोसिएशनलाही मध्ये घेतलं होतं. (Kushti Olympic Quota)

(हेही वाचा – Mamata Banerjee: राज्यात २०१०पासून जारी केलेली OBC प्रमाणपत्रे रद्द, हायकोर्टाचा ममता बॅनर्जींना दणका)

खेळाडूंचं हित बघूनच निर्णय घेतला – संजय सिंग

आता ऑलिम्पिकसाठी उरलेला कमी वेळ, दुखापतींची शक्यता हे मुददे खेळाडूंनी या पत्रात मांडले होते. त्यानंतर संजय सिंग यांनी कुस्ती संघटनेची एक बैठक घेऊन निवड चाचणी स्पर्धा रद्द करत असल्याचं म्हटलं आहे. ‘कुस्ती संघटनेचे पदाधिकारी, निवड समितीचे सदस्य आणि पुरुष व महिला खेळाडूंचे राष्ट्रीय प्रशिक्षक अशा सगळ्यांची एक बैठक झाली. आणि या बैठकीत निवड चाचणी रद्द करण्याचा निर्णय झाला. (Kushti Olympic Quota)

खेळाडूंचं हित बघूनच हा निर्णय आम्ही घेतला आहे. यामुळे खेळाडूंना आपल्या सरावावर लक्ष केंद्रीत करता येईल,’ असं संजय सिंग मीडियाशी बोलताना म्हणाले. खेळाडूंसाठी परदेशात प्रशिक्षणाची सोयही उपलब्ध करून देण्यात येईल, असं संजय सिंग म्हणाले. दरम्यान, भारतीय कुस्तीत गाजलेलं ब्रिजभूषण शरण यांच्यावरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपांच्या प्रकरणातही आता कोर्टाने शरण यांच्यावर आरोप निश्चिती केली आहे. (Kushti Olympic Quota)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.