-
ऋजुता लुकतुके
कुस्तीमधील वाद काही शमण्याचं नाव घेत नाहीएत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर निकाल निश्चितीचा आरोप झाला आणि ते प्रकरण न्याप्रवीष्ट आहे. त्याचवेळी आता माजी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आपल्या मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषणाची घोषणा केली आहे. ‘कुस्तीसाठी जीव गेला तरी चालेल,’ असा इशाराच त्यांनी दिला आहे. कुस्तीतील राजकारण थांबलं पाहिजे आणि खेळाडूंना न्याय एक राज्य-एक खेळ-एक संघटना ही संकल्पना महाराष्ट्र सरकारने राबवली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. आताची परिस्थिती कायम राहिली तर राज्यात कुस्तीपटूंची पुढची पिढीच तयार होणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते उपोषण करणार आहेत. पण, गरज पडल्यास ते मंत्रालयावर मोर्चा नेणार आहेत. (Kusti Controversy)
(हेही वाचा – Champions Trophy 2025 : भारताचा ध्वज न लावण्याच्या प्रकरणावर पाक क्रिकेट मंडळाची सारवासारव)
महाराष्ट्रात कुस्ती एक पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो. पण, खेळाची राज्यात वाताहत होत असल्याचं दु:ख दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ‘त्यासाठी मी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहे. आजवर ज्या स्पर्धा झाल्यात त्यात एकावर्षी चारदा स्पर्धा घ्याव्या लागल्या आहेत. त्याऐवजी दरवर्षी एक महाराष्ट्रकेसरी स्पर्धा झाली तर खेळाडूंना जास्त फायदा होईल,’ असं चंद्रहार पाटील म्हणाला. या प्रमुख आणि इतर मागणीला घेऊन ते आंदोलन करत आहेत. मात्र त्याची वेळीच दखल घेतल्या गेली नाही तर मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा ही चंद्रहार पाटील यांनी दिला आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना भेटून याबाबत परत निवेदन देणार. मात्र सरकारने माझ्या मागणीबाबत विचार केला नाही तर लवकरच मंत्रालयावर धडक मोर्चा काढू असेही ते यावेळी म्हणाले. (Kusti Controversy)
(हेही वाचा – तेलंगणात Congress सरकारने ओलांडली मुस्लिम तुष्टीकरणाची परिसीमा; रमझानमध्ये मुसलमान कर्मचाऱ्यांना सवलत)
चंद्रहार पाटील यांच्या नेमक्या मागण्या काय?
- राज्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दरवर्षी एकदाच झाली पाहिजे.
- एक राज्य-एक खेळ-एक संघटना हि संकल्पना महाराष्ट्र शासनाने राबवली पाहिजे.
- महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजकाने महाराष्ट्र केसरीच्या विजेत्या पैलवानास 1 कोटी रुपयांचे बक्षिस दिले पाहिजे.
- ज्या पद्धतीने तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर DYSP पदी थेट नियुक्ती करण्यात येते, त्याच पद्धतीने एकदा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर PSI पदी थेट नियुक्ती झाली पाहिजे.
- पै. शिवराज राक्षे व पै. महेंद्र गायकवाड यांच्यावरील 3 वर्षांची बंदी हटवण्यात यावी आणि राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पैलवानांची डोपिंग टेस्ट झाली पाहिजे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community