Kusti Controversy : ‘कुस्ती फेडरेशन ऑलिम्पिक संघ निवडणार, ऑलिम्पिक असोसिएशन नाही’ – संजय सिंग

Kusti Controversy : कुस्ती फेडरेशनने ऑलिम्पिकसाठी संघ निवडीच्या आपल्या अधिकारावर दावा केला आहे 

186
Kusti Controversy : ‘कुस्ती फेडरेशन ऑलिम्पिक संघ निवडणार, ऑलिम्पिक असोसिएशन नाही’ - संजय सिंग
Kusti Controversy : ‘कुस्ती फेडरेशन ऑलिम्पिक संघ निवडणार, ऑलिम्पिक असोसिएशन नाही’ - संजय सिंग
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ (Paris Olympics 2024) साठीचा संघ निवडण्याचा अधिकार भारतीय कुस्ती फेडरेशनचा आहे. त्यात ऑलिम्पिक (Olympics) असोसिएशनने ढवळाढवळ करू नये, असं फेडरेशनचे अध्यक्ष संजय सिंग (Sanjay Singh) यांनी म्हटलं आहे. फेडरेशनकडून संघ निवडीसाठी नवीन चाचणी स्पर्धा भरवण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ‘पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुठले कुस्तीपटू सहभाग घेणार हे ठरवण्याचा अधिकार कुस्ती फेडरेशनला आहे. ऑलिम्पिक असोसिएशनला नाही,’ अशी भूमिका सिंग यांनी मांडली. (Kusti Controversy )

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: निवडणुकीमुळे फुलांच्या दरात वाढ, काय आहेत भाव? जाणून घ्या)

अलीकडेच भारतीय कुस्ती संघ ऑलिम्पिक असोसिएशन (Olympic Association) निवडणार अशा बातम्या पसरल्या होत्या. पण, जागतिक कुस्ती फेडरेशनने आता भारतीय फेडरेशनवरील बंदी हटवून त्यांना मान्यता दिली आहे, हे कारण देत सिंग यांनी संघ निवडीचे अधिकारही आपल्याकडे असल्याचं म्हटलं आहे. भारताला नुकत्याच इस्तंबूल इथं झालेल्या कुस्ती ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेनंतर एकूण सहा ऑलिम्पिक कोटा मिळाले आहेत. म्हणजेच एकूण सहा खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळू शकतात. (Kusti Controversy )

खेळाडूंनी जिंकलेला कोटा हा त्या खेळाच्या राष्ट्रीय फेडरेशनचा असतो. त्यामुळे भारताला मिळालेल्या कोटावर कुठले खेळाडू जाणार याची निवड फेडरेशनला करता येते. शक्यतो ज्या खेळाडूंना तो कोटा मिळाला, त्याच खेळाडूची निवड करण्याचा संकेत आहे. (Kusti Controversy )

(हेही वाचा- T20 World Cup 2024 : जय शाह आणि रोहित शर्माने केलं भारतीय जर्सीचे अनावरण )

ऑलिम्पिक कोटा जिंकलेले भारतीय कुस्तीपटू,

अमन सेहरावत, निशा दाहिया, अंतिम पनघल (५३ किलो), विनेश फोगाट (५० किलो), अंशू मलिक (५७ किलो) व रितिका हुडा (७० किलो)

या खेळाडूंनाही निवड चाचणीला सामोरं जावं लागेल.

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.