-
ऋजुता लुकतुके
सन २०२८ च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश हा आता जवळ जवळ निश्चित आहे आणि ऑलिम्पिक परिषदेनं आयोजकांची क्रिकेट समावेशाची शिफारस दाखल करून घेतली आहे. त्यातच ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी २०२८ पासून क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये दिसेल, असंही म्हटलं आहे. (LA Olympics 2028)
सध्या क्रिकेटचे ग्रह आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्चीचे आहेत. २०२८ च्या लॉस एंजलीस इथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत टी-२० प्रकाराचा समावेश होणार हे आता जवळ जवळ निश्चित आहे. ऑलिम्पिक परिषदेच्या कार्यकारिणीचं अधिकृत शिक्कामोर्तब बाकी आहे. तोपर्यंत, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी २०२८ पासून क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये दिसेल असं सकारात्मक भाष्यही केलं आहे. (LA Olympics 2028)
तांत्रिक दृष्ट्या सांगायचं झालं तर ऑलिम्पिक परिषदेच्या मुंबईत झालेल्या दोन दिवसीय बैठकीत, त्यांनी आयोजकांकडून आलेला पाच खेळांच्या ऑलिम्पिक समावेशाचा प्रस्ताव दाखल करून घेतला आहे. आता यावर अंतिम निर्णय किंवा शिक्कामोर्चब रविवारी शक्य आहे, जेव्हा ऑलिम्पिक परिषदेचे पदाधिकारी त्यावर अधिकृत निर्णय घेतील. (LA Olympics 2028)
#WATCH | Mumbai: “With regard to the sports program of Los Angeles 28 the IOC had to take three decisions. First, it was the Los Angeles Organising Committee to introduce five new sports. These five sports are cricket, baseball, softball, flag football & squash,” says IOC… pic.twitter.com/EMyepbKCbX
— ANI (@ANI) October 13, 2023
(हेही वाचा – Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण द्या अन्यथा … ; मनोज पाटील यांचा सरकारला इशारा)
लॉस एंजलिस ऑलिम्पिक आयोजन समितीने क्रिकेट बरोबरच आणखी चार खेळांचा प्रस्तावही ऑलिम्पिक समितीसमोर ठेवला आहे. यात स्कॉश हा आणखी एक खेळ भारतात खेळला जाणारा आहे. आणि या व्यतिरिक्त फ्लॅग फुटबॉल, लॅक्रॉस आणि बेसबॉल किंवा सॉफ्टबॉल असे आणखी तीन खेळ आयोजकांनी सुचवले आहेत. (LA Olympics 2028)
क्रिकेटच्या समावेशाविषयी बोलताना ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष खॉमस बाख म्हणाले की, ‘क्रिकेट २०२८ पासून ऑलिम्पिकमध्ये दिसायला लागेल, असं म्हणता येईल. क्रिकेटच्या समावेशासाठी आम्ही कुठल्या एका देशाच्या क्रिकेट बोर्डाशी बोलणार नाही. तर खेळाची मध्यवर्ती संघटना म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशीच आम्ही संवाद साधू.’ अर्थात, क्रिकेटच्या समावेशाबरोबरच नेमके किती संघ खेळणार, स्पर्धा कशी होणार इत्यादी गोष्टीही वेळेत स्पष्ट कराव्या लागतील. (LA Olympics 2028)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community