Lakshya, Sindhu Take Break : ऑलिम्पिक खेळलेले लक्ष्य, सिंधू व सात्त्विकसाईराज, चिराग यांची आगामी सुपर सीरिजमधून माघार

Lakshya, Sindhu Take Break : लक्ष्य सेनने उपांत्य फेरीत प्रवेश करूनही त्याचं कांस्य हुकलं.

105
Lakshya, Sindhu Take Break : ऑलिम्पिक खेळलेले लक्ष्य, सिंधू व सात्त्विकसाईराज, चिराग यांची आगामी सुपर सीरिजमधून माघार

पॅरिस ऑलिम्पिक संपल्यानंतर आता खेळांच्या नियमित स्पर्धांचं वेळापत्रक सुरू झालं आहे. यात बॅडमिंटनमधील जपान ओपन सुपर सीरिज येत्या २४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ऑलिम्पिकमध्ये खेळलेले लक्ष्य सेन, पी व्ही सिंधू, एच एस प्रणॉय, सात्त्विकसाईराज, चिराग हे खेळाडू जपान ओपन खेळणार नाहीएत. ऑलिम्पिक विजेता व्हिक्टर एक्सेलसन मात्र जपान ओपन खेळणार आहे. ऑलिम्पिक नंतर काहीच दिवसांत ही स्पर्धा होत असल्यामुळे अनेक स्टार खेळाडूंनी विश्रांती घेणंच पसंत केलं आहे. (Lakshya, Sindhu Take Break)

लक्ष्य सेनचं हे पहिलंच ऑलिम्पिक होतं आणि उपांत्य फेरीत प्रवेश करून त्याने चुणूक दाखवून दिली. पण, व्हिक्टर एक्सेलसन विरुद्ध पहिल्या गेममध्ये २०-१७ आणि दुसऱ्या गेममध्ये ७-० अशी आघाडी असतानाही लक्ष्यने दोन गेममध्येच हा सामना गमावला. कांस्य पदकाच्या लढतीततही मलेशियाच्या खेळाडूविरुद्ध पहिला गेम जिंकून त्याने सामना गमावला. ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेत दडपणाखाली तो कोसळताना दिसला. (Lakshya, Sindhu Take Break)

(हेही वाचा – Independence Day Speech : स्वातंत्र्य दिनाविषयी भाषण कसे सुरु कराल?)

तर पी व्ही सिंधू आणि सात्त्विकसाईराज, चिराग ही दुहेरीतील जोडी बाद फेरीच्या पहिल्याच सामन्यात स्पर्धेतून बाहेर पडली. या धक्क्यांनंतर भारतीय बॅडमिंटनपटूंनी आता सराव पुन्हा सुरू केला आहे. सरावावर लक्ष केंद्रीत करण्यासाठीच पहिल्या जपान ओपनपासून लांब राहण्याचं ठरवलं आहे. (Lakshya, Sindhu Take Break)

भारतीय खेळाडूंबरोबरच इतरही अनेक ऑलिम्पिक खेळलेल्या खेळाडूंनी जपान ओपनमधून माघार घेतली आहे. जागतिक विजेते जिओ संग, कांग मिन हुक, चेन यु फाय तसंच रहातू यांनीही विश्रांती घेणं पसंत केलं आहे. लक्ष्यने शेवटच्या साखळी सामन्यात पराभव केलेला आणि ऑल इंग्लंड विजेता जोनाथन ख्रिस्ती मात्र स्पर्धेत खेळणार आहे. त्याच्याबरोबरच ताय त्सु सिंग आणि एकने यामागुची या महिलांमधील प्रमुख खेळाडूही खेळणार आहेत. (Lakshya, Sindhu Take Break)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.