गोल्डन बाॅय निरज चोप्राचा नवा विक्रम; डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय

119

भारताचा गोल्डन बाॅय भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताच्या शीरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आपल्या दुखापतीतून बरे होत त्याने जोरदार पुनरागमन केले आहे. नीरज चोप्राने शुक्रवारी 89.08 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह लुसाने डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले आहे. हे विजेतपद पटकावणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला आहे. या विजेतेपदासह नीरजने झुरिच येथे 7 आणि 8 सप्टेंबर रोजी होणा-या डायमंड लीगच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला आहे.

नीरजने पहिल्याच प्रयत्नात 89.9 मीटर अंतरावर फेकला भाला

हंगेरीतील बुडाबेस्ट येथे होणा-या वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 साठीही तो पात्र ठरला आहे. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 89.8 मीटर अतंरावर भाला फेकला. यानंतर नीरजने दुस-या प्रयत्नात 85.18 मीटर भाला फेकला. त्यानंतर त्याने तिसरा थ्रो केलाच नाही. त्यानंतर चोप्राचा चौथा प्रयत्न फाऊल घोषित झाला आणि नंतर त्याने पाचवा प्रयत्नदेखील केला नाही. पहिल्या थ्रोच्या बळावर नीरजला विजयी घोषित करण्यात आले.

( हेही वाचा: शिवसेना बनली ब्रिगेडी, राज ठाकरेंना संधी )

सर्वोत्कृष्ट थ्रो

नीरज चोप्राच्या कारकिर्दीतील 89.08m हा तिसरा सर्वोत्तम प्रयत्न होता. नीरजच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट थ्रोबद्दल सांगताना म्हटले जाते की, त्याने स्टाॅकहोम डायमंड लीगमध्ये 89.94 वर भाला फेकला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.