- ऋजुता लुकतुके
काही दिवसांपूर्वी फॉर्म्युला वनच्या झगमगत्या दुनियेत एका बातमीने खळबळ उडाली होती. ७ वेळा अजिंक्यपद पटकावणारा लुईस हॅमिल्टन (Lewis Hamilton) २०२५ च्या हंगामात मर्सिडिजला सोडून फेरारीकडे जात असल्याची बातमी पसरली आणि या एकाच बातमीची चर्चा सगळीकडे सुरू झाली. काही चाहत्यांनी फेरारीच्या चार्ल्स लेक्लर्क बरोबर आता हॅमिल्टनची जोडी जमणार म्हणून आनंद व्यक्त केला. तर २०१३ पासून घनिष्ट नातं असलेला मर्सिडिज संघ हॅमिल्टनने का सोडला असावा असं आश्चर्यही व्यक्त केलं. (Lewis Hamilton to Ferrari)
रेसिंगन्यूज ३६५ या वेबसाईटने याविषयीचं कारण एका बातमीतून देऊ केलं आहे. हॅमिल्टनचा न विश्वास असलेला मर्सिडिजमधील एक सहकारी सोडून जात असल्यामुळे हॅमिल्टनने हे पाऊल उचलल्याचं या बातमीत म्हटलं आहे. फॉर्म्युला वन कारच्या कामगिरीवर लक्ष ठेवणारे मर्सिडिजमधील तंत्रज्ञ लॉईक सेरा पुढील हंगामापासून फेरारीकडे जात आहेत. आणि त्यांच्याबरोबर फेरारीमध्ये जाण्याचा निर्णय हॅमिल्टनने (Lewis Hamilton) घेतल्याचा दावा रेसिंगन्यूज ३६५ या पोर्टलने केला आहे. (Lewis Hamilton to Ferrari)
Team Statement
Scuderia Ferrari is pleased to announce that Lewis Hamilton will be joining the team in 2025, on a multi-year contract. pic.twitter.com/moEMqUgzXH
— Scuderia Ferrari (@ScuderiaFerrari) February 1, 2024
(हेही वाचा – UlhasNagar Crime : शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार; भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक)
यासाठी हॅमिल्टनने २०२५ च्या हंगामात फेरारीकडे जायचं ठरवलं
२०२१ मध्ये हॅमिल्टनने (Lewis Hamilton) मर्सिडिज संघाबरोबर शेवटचं फॉर्म्युला वन अजिंक्यपद पटकावलं. त्यानंतर मात्र रेडबुल संघाने मर्सिडिजला तगडं आव्हान दिलं होतं. २०२३ च्या हंगामात जी कार मर्सिडिजने हॅमिल्टनला रेसिंगसाठी उपलब्ध करून दिली, तिच्यावर त्याने जाहीररित्या नाराजी व्यक्त केली होती. कारच्या कामगिरीवर तो खुश नव्हता. आणि महत्त्वाचं म्हणजे सेरा आणि हॅमिल्टनच यावर एकमत होतं. (Lewis Hamilton to Ferrari)
म्हणूनच दोघांनी एकत्र मर्सिडिज सोडण्याचं ठरवलं असं वेबसाईटने बातमीत म्हटलं आहे. खरंतर हॅमिल्टनने (Lewis Hamilton) २०२४ आणि २०२५ या हंगामांसाठी मर्सिडिजबरोबर कराराचं नुतनीकरण केलेलं होतं. पण, या करारात एका वर्षानंतर पुन्हा अवलोकन करण्याचं कलम होतं. आणि त्याचा फायदा घेत हॅमिल्टनने २०२५ च्या हंगामात फेरारीकडे जायचं ठरवलं आहे. फेरारीबरोबरचा करार काही वर्षांसाठीचा असल्याचं फेरारीने म्हटलं आहे. (Lewis Hamilton to Ferrari)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community