ज्या कोरोना महामारीने सर्वसामान्यांच्या रोजीरोटीवर परिणाम केला, त्याच कोरोनाने श्रीमंतांच्याही गंगाजळीला धक्का दिला आहे. त्याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी! लहानपणापासून मेस्सी ज्या क्लबशी जोडला होता, तेथून तो जगप्रसिद्ध झाला, त्या बार्सिलोना क्लबला कोरोना महामारीमुळे आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे त्यांना आता मेस्सीला वेतन देणे शक्य होत नाही. म्हणूनच क्लबने आर्थिक विवंचनेचे कारण देत मेस्सीसोबतचे २१ वर्षांचे संबंध तोडले आहेत.
क्लबवर १.१८ बिलियन डॉलर कर्ज!
मागील २१ वर्षांचे मेस्सी सोबतचे संबंध तोडताना बार्सिलोना क्लबने त्यामागील खुलासा केला. कोरोनामुळे क्लबला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आम्हाला मेस्सीला त्याला अपेक्षित मानधन देता येणार नाही, म्हणूनच ३० जून रोजी संपलेला त्याच्यासोबतचा करार पुढे वाढवण्यात येत नाही. सध्या क्लबवर १.१९ बिलियन डॉलर (भारतीय चालनानुसार ८७ अब्ज, ४२ कोटी, १५ लाख, ९८ हजार रुपये) इतके झाल्याने त्याच्यासोबतचा करार रद्द करण्यात येत असल्याचे क्लबच्या वतीने सांगण्यात आले.
(हेही वाचा : टोकियो ऑलिम्पिक २०२० : अखेर ४१ वर्षांनंतर रचला इतिहास, हॉकी टीमचा विजय!)
२०१७ ते २०२० हा शेवटचा करार!
मेस्सीचा बार्सिलोना क्लबसोबत २०१७ ते २०२० या ४ वर्षांसाठीचा शेवटचा करार ठरला. त्यासाठी त्याला बार्सिलोना क्लबने ६७४ मिलियन डॉलर (भारतीय चलनानुसार ४९ अब्ज ९५ कोटी ४२ लाख ५१ हजार ४०० रुपये) इतके मानधन ४ वर्षांसाठी ठरवले होते. हा करार ३० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आला होता.
१३ वर्षांपासून मेस्सी बार्सिलोनासोबत जोडलेला
मेस्सी हा १३ वर्षांचा असल्यापासून बार्लिसलोना क्लबसोबत खेळत आहे. चार वर्षे प्रशिक्षण घेतल्यानंतर मेस्सीने बार्सिलोना वरिष्ठ संघासोबत खेळण्यास सुरुवात केली होती. त्याने १७ वर्षांत ३५ किताब आपल्या नावे केले आहेत. त्याचबरोबर बार्सिलोना क्लबकडून खेळताना त्याने ७७८ सामन्यात एकूण ६७२ गोल केले आहेत. पाचवेळा फीफा प्लेअर ऑफ द इअर असलेल्या मेस्सीने २०१७ या वर्षी नव्याने करार केला होता. हा करार ३० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आला होता.
Join Our WhatsApp Community