- ऋजुता लुकतुके
अर्जेंटिना संघाचा स्टार कर्णधार लिओनेल मेस्सीला (Lionel Messi) विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी संघातून वगळण्यात आलं आहे. पण, त्याचं कारण अर्थातच त्याला कोपा अमेरिका चषकादरम्यान झालेली दुखापत हे आहे. अर्जेंटाईन संघ येत्या काही दिवसांत चिली आणि कोलंबिया या संघांविरुद्ध पात्रता सामने खेळणार आहे. पण, त्यासाठी निवडलेल्या २८ जणांच्या संघात मेस्सीला स्थान नाही. मेस्सी सध्या इंटरमियामी संघासाठी खेळतो.
आणि कोपा अमेरिका चषकाच्या अंतिम फेरीत मेस्सीला दुखापत झाली होती. सध्या तो त्याचा क्लब इंटर मियामी मध्ये विश्रांती घेत आहे. मेस्सीबरोबरच (Lionel Messi) गोलकीपर दी मारियाही या संघात नाहीए. मारियाने कोपा अमेरिकेतील विजेतपदानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली होती.
#SelecciónMayor El entrenador Lionel #Scaloni realizó una nueva convocatoria de cara a la doble fecha 🇨🇱🇨🇴 de eliminatorias de septiembre.
¡Estos son los citados! ¡Vamos Selección! pic.twitter.com/xjlDrwcfzg
— 🇦🇷 Selección Argentina ⭐⭐⭐ (@Argentina) August 19, 2024
(हेही वाचा – Ind vs Aus, Border-Gavaskar Trophy : रोहित, विराटची नाही तर ‘या’ फलंदाजाची ऑस्ट्रेलियाला भीती)
अर्जेंटिना संघाचा नवीन चेहरा बघायला मिळणार
लायोनेल स्केलोनी हे अर्जेंटिना संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांनी यंदा दोन नवीन खेळाडूंना अर्जेंटिनाच्या संघात संधी दिली आहे. मिडफिल्डर एझेक्वील फर्नांडेझ आणि स्ट्रायकर व्हेलेटिल केस्टेलेनोस या युवा खेळाडूंना संघात स्थान मिळालं आहे. गार्नाको, कार्बोनी, बार्को आणि सोल या इतर युवा खेळाडूंनाही संघात स्थान मिळालं आहे. त्यामुळे पुढील विश्वचषकात अर्जेंटिना संघाचा नवीन चेहरा बघायला मिळणार हे नक्की आहे. अर्जेंटाईन संघ सध्या स्थित्यंतरातून जात असल्याचं दिसतंय. (Lionel Messi)
या नवीन खेळाडूंची परीक्षा ५ सप्टेंबरला चिलीविरुद्ध होणार आहे. तर त्यानंतरचा सामना १० सप्टेंबरला कोलंबियाविरुद्ध होईल. पहिला सामना मायदेशी ब्युनॉसआयर्स इथं होणार आहे. तर कोलंबियाविरुद्धच्या सामन्यासाठी संघ बॅरांक्विलाला प्रवास करेल. (Lionel Messi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community