फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत अर्जेंटिना संघाचा कर्णधार स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सीने अंतिम सामन्यात फ्रान्सवर रोमहर्षक विजय मिळवला. त्यामुळे अर्जेंटिना विश्वविजेता बनला आहे. संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर मेस्सीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मेस्सीनं म्हटले आहे की, ‘मी विश्चचषक विजयाचं स्वप्न अनेक वेळा पाहिलं, मला ही गोष्ट इतकी मनापासून हवी होती की, मला अजूनही विश्वास होत नाही. मी माझ्या कुटुंबाचे, ज्यांनी मला पाठिंबा दिला आणि ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आम्ही पुन्हा एकदा दाखवून दिले की, जेव्हा आम्ही एकत्र लढतो आणि एकत्र येतो तेव्हा आम्ही जे करायचे ते साध्य करतोच. हे संपूर्ण टीमचे यश आहे जे कोणत्याही व्यक्तीपेक्षा वरचढ आहे. हीच आमची ताकद होती त्याच स्वप्नासाठी आम्ही लढलो, हे स्वप्न अर्जेंटिनाचे होते. आम्ही ते पूर्ण करुन दाखवले.’
( हेही वाचा : आता महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायद्यासाठी ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ )
फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना ९० मिनिटांच्या सामन्यात ७९ मिनिटांपर्यंत अर्जेंटिना २-० अशा उत्तम आघाडीवर होती. पण त्यानंतर फ्रान्सच्या कायलिन एम्बाप्पेनं अद्भुत खेळ दाखवत हॅट्रिक केली. मेस्सीनंही त्याला कडवी झुंज देत आणखी एक गोल केला आणि सामना ३-३ अशा बरोबरी आला. ज्यामुळे पेनल्टी शूटआऊट झालं. ज्यात अर्जेंटिनाचा गोलकिपर मार्टीनेज आणि संघानं अप्रतिम कामगिरी करत ४-२ अशा फरकानं सामना जिंकला आणि अखेर मेस्सीच्या अर्जेंटिनाने फिफा वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले.
Join Our WhatsApp Community