सध्या सर्वत्र टी-२० विश्वचषकाची चर्चा सुरू आहे. भारताने आता टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. गटफेरीत बांगलादेशविरुद्धच्या लढतील भारताने शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देत पाच धावांनी थरारक विजय मिळवला. बांगलादेशचा फलंदाज लिटन दासने या सामन्यात २७ चेंडूमध्ये तब्बल ६० धावा केल्या. लिटन दास खेळत असताना बांगलादेश विजयाच्या उंबरठ्यावर होता परंतु तो धावबाद झाल्याने बांगलादेश जिंकू शकला नाही. भारताचा या सामन्यात विजय झाला असला तरी सर्वत्र लिटन दासच्या खेळीचे कौतुक झाले, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सुद्धा लिटन दासला बॅट गिफ्ट दिली आहे. टी-२० विश्वचषकात अशी अफलातून खेळी खेळणारा हा लिटन दास नक्की आहे तरी कोण? त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया…
लिटन दास हा श्रीकृष्णाचा निस्सिम भक्त
बांगलादेशचा फलंदाज लिटन दास हा श्रीकृष्णाचा निस्सिम भक्त आहे. इन्स्टाग्राम बायोमध्ये त्याने श्रीकृष्णाचा सेवक आणि प्राण्यांवर प्रेम करणारा असे लिहिले आहे. तसेच जीवनात कधीही हार मानू नका कारण एका मोठ्या वादळानंतर नेहमीच इंद्रधनुष्य येत असते असेदेखील लिटनने इन्स्टा बायोमध्ये नमूद केले आहे. लिटन दासचा जन्म १३ ऑक्टोबर १९९४ मध्ये बांगलादेशमधील दिनाजपूरमध्ये झाला.
( हेही वाचा : Post Office Scheme : ९५ रुपये गुंतवा, १४ लाखांपर्यंत परतावा मिळवा! जाणून घ्या सरकारी जीवन विमा योजनेविषयी… )
बांगलादेशमध्ये जन्माला येऊन सुद्दा त्याने कायम हिंदू असण्याचा अभिमान बाळगला आहे. पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशमध्येही हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येतात. मुस्लिमबहुल देशात राहून सुद्धा राहून त्याने आपली विचारधारा जपली आहे याचा प्रत्यय लिटन दासचे इन्स्टाग्राम बायो बघून येतो. यंदाच्या नवरात्री दरम्यान त्याने सोशलमिडियावर दुर्गापूजेच्या शुभेच्छाही दिल्या होत्या यामुळे त्याला खूप टिका-टीप्पणी सहन करावी लागली होती अनेकांनी त्याला धर्मपरिवर्तन करण्याचाही सल्ला दिला होता कारण बांगलादेशमध्ये राहून हिंदू सण-उत्सावाच्या शुभेच्छा देणे अनेकांना रुचले नव्हते. त्याला प्रचंड ट्रोलही करण्यात आले होते. लिटन दासला जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या होत्या.
बांगलादेश क्रिकेटचा ‘हिंदू’ शेर
लिटन दास हिंदू असूनही भारताविरुद्ध बांगलादेशसाठी खेळताना आपली सर्वोत्तम खेळी करण्याचा त्याने प्रयत्न केला. स्वत:चा धर्म जपत ज्या मातीत जन्म घेतला त्या मातीशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ कसे रहावे हे लिटन दासने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. मुस्लिमबहुल देशात राहून सुद्धा त्याने आपली हिंदू संस्कृती, हिंदू म्हणून असलेली ओळख कायम ठेवली हे विशेष; त्याने बांगलादेशसाठी आतापर्यंत ३५ कसोटी, ५७ एकदिवसीय आणि ६४ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत २ हजार ११२, एकदिवसीय सामन्यात १ हजार ८३५ तर टी -२० मध्ये १ हजार ३७८ धावा केल्या आहेत. त्यामुळे लिटन दासला नक्कीच बांगलादेश क्रिकेटचा हिंदू शेर म्हणावे लागेल.
Join Our WhatsApp Community