Lok Sabha Elections 2024 : सूर्यकुमार यादव, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे यांनी केलं लोकसभेसाठी मतदान

पाचव्या टप्प्यातील मतदानात मुंबईकर क्रिकेटपटूंनी आपला मतदानाचा हक्क बजावला

158
Lok Sabha Elections 2024 : सूर्यकुमार यादव, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे यांनी केलं लोकसभेसाठी मतदान
Lok Sabha Elections 2024 : सूर्यकुमार यादव, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे यांनी केलं लोकसभेसाठी मतदान
  • ऋजुता लुकतुके

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात मुंबई, ठाणे आणि कल्याण मतदारसंघातही मतदान झालं. त्यामुळे कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबरच मुंबईत राहणाऱ्या क्रिकेटपटूंनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. सूर्यकुमार यादव, (Suryakumar Yadav) अजिंक्य रहाणे यंदाच्या आयपीएलमध्ये अनुक्रमे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांचं प्रतिनिधित्व करत होते. या दोन्ही संघांचं आव्हान संपल्यामुळे दोघंही आपल्या गावी मुंबईला परतले होते. आणि सोमवारी आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसले. तर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरही मुलगा अर्जुनबरोबर मत देण्यासाठी पोहोचला. (Lok Sabha Elections 2024)

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) हातावर शाई लावलेला आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि ‘मतदान करून देशाचं भवितव्य घडवा,’ असा संदेशही त्याने लिहिला आहे. (Lok Sabha Elections 2024)

(हेही वाचा – Loksabha Election 2024 : उद्धव ठाकरेंविरोधात आशिष शेलारांची निवडणूक आयोगाकडे तक्रार!)

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि पत्नी राधिकाही मत देण्यासाठी घराबाहेर पडले होते. दोघांनी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत इतरांना मतदानासाठी प्रोत्साहन देताना दिसले. ‘आम्ही आमचं कर्तव्य बजावलं. तुम्ही मत दिलं का?’ असं अजिंक्यने ट्वीटर संदेशात लिहिलं आहे. (Lok Sabha Elections 2024)

(हेही वाचा – Monsoon fishing ban: १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीवर बंदी)

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) निवडणूक आयोगानं मतदान मोहिमेत विशेष स्थान दिलं आहे. त्या अंतर्गत लोकांमध्ये मतदान जागृतीसाठी सचिनने काही व्हीडिओ आणि ऑडिओ संदेशही दिले आहेत. सोमवारी मतदानासाठी सचिन आपला मुलगा अर्जुनसोबत हजर होता. पत्नी अंजली आणि सारा इंग्लंडमध्ये साराच्या दीक्षांत सोहळ्यासाठी गेल्याचं समजतं. मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन करताना सचिनने अलीक़ेच एक मीडिया पत्रक काढलं होतं. ‘देशातील सगळ्या समस्या या दोन कारणांमुळे उद्भवतात. एक म्हणजे, तुम्ही विचार न करता वागता. आणि दुसरं म्हणजे, तुम्ही खूप विचार करता आणि करत काहीच नाही. त्यामुळे माझी लोकांना कळकळीची विनंती आहे की, तुम्ही बाहेर पडा आणि मतदान करा,’ असं सचिन या संदेशात म्हणाला होता. (Lok Sabha Elections 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.