ऋजुता लुकतुके
२०२५ चा नवीन क्रीडा हंगाम आता सुरू झाला आहे. आणि भारताची महिला मुष्टियोद्धा लवलिना बोरगोहेनसमोर (Lovelina Borgohain) आव्हान आहे ते वजनी गट बदलण्याचं. यापूर्वी ती ७५ किलो वजनी गटात खेळत होती. पण, तो गट आता ऑलिम्पिकमधून काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे लवलिनला ७० किंवा ८० किलो वजनी गटाचा पर्याय निवडायचा आहे. आणि ती आणि तिचे प्रशिक्षक यावर नीट विचार करत आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने २०२८ च्या लॉस एंजलीस ऑलिम्पिकसाठीची रुपरेषा उघड केली आहे. आणि त्यामुळे लवलिना बोरगोहेन पेचात सापडली आहे. (Lovelina Borgohain)
सुरुवातीला तिचा विचार ७० किलो वजनी गटात खेळण्याचा आहे. कारण, ८० किलोपर्यंत वजन वाढवणं हे तिच्यासाठी सोपं नाही. पण, सध्या ती वजनी गट काढून टाकल्यामुळे धक्का बसलेल्या अवस्थेत आहे. ‘ही बातमी माझ्यासाठी धक्कादायक होती. मी अशी अपेक्षाच केली नव्हती. पण, आता मला ७० किलो गट बरा वाटतोय. ८० किलोच्या प्रतिस्पर्धी माझ्यासाठी कठीण असतील,’ असं लवलिन पत्रकारांशी बोलताना म्हणाली. (Lovelina Borgohain)
हेही वाचा- Jejuri च्या खंडोबा मंदिर आणि गडाला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा
पण, त्याचवेळी तिच्या वैयक्तिक प्रशिक्षक प्रणामिका बोरा यांनी बदलत्या परिस्थितीचा आढावा घेण्याचा सल्ला तिला दिला आहे. ‘ही बातमी आमच्यासाठी धक्कादायक आहे. पण, वजनी गट बदलायचा ही सोपी गोष्ट नाही. आम्हाला नीट विचार करून निर्णय घ्यावा लागेल. एक बरं आहे की, लवलिनला उंची आहे. आणि त्यामुळे ती ८० किलो गटांतही खेळू शकते. तिचं वजन ७४ किलो आहे. आणि ते ४ किलोनी कमी करायचं तर तिची ताकदही कमी होऊ शकते. याचा विचारही झाला पाहिजे,’ असं बोरा म्हणाल्या. (Lovelina Borgohain)
हेही वाचा- Archery Team Misses Event : व्हिसाला झालेल्या उशिरामुळे महिला तिरंदाजांचा विश्वचषक हुकला !
लवलिनाला यापूर्वीही वजनी गट बदलावे लागले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी तिचा ६९ हा वजनी गट रद्द करण्यात आला. त्यामुळे तिने वजन वाढवलं आणि ती ७५ किलो गटांत खेळायला लागली. आता पुन्हा तिच्यासमोर वजनी गट बदलण्याचं आव्हान असेल. (Lovelina Borgohain)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community