T-20 च्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या; ‘हा’ संघ केवळ 15 धावांत झाला All Out

143

बिग बॅश लिगच्या 2022-23 हंगामात टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचणारा सामना पाहायला मिळाला. या लीगमध्ये सिडनी थंडर आणि अॅडलेड स्ट्रायकर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात T-20 च्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या झाली. या दोघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना सिडनी थंडरचा संघ अवघ्या 15 धावांत ऑलआउट झाला आहे. टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या जाणून घेऊया.

थायलंड विरुद्ध मलेशिया (2022)

याचवर्षी थायलंड आणि मलेशिया यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात एक विक्रमी धावसंख्या झाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या थायलंडचा संघ 13.1 षटकात 30 धावांवर सर्वबाद झाला.

( हेही वाचा: FIFA World Cup : जगातील सर्वात महागडी क्रीडा ट्रॉफी; किंमत माहित आहे का? )

तुर्की विरुद्ध लक्झेंबर्ग (2019)

2019 मध्ये तुर्की आणि लक्झेंबर्ग यांच्यात खेळल्या गेलेल्या T-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेला तुर्की संघ अवघ्या 28 धावांवर गारद झाला होता. लक्झेंबर्गने हा सामना 8 गडी राखून जिंकला.

तुर्की विरुद्ध झेक रिपब्लिक (2019)

2019 मध्ये तुर्की आणि झेक रिपब्लिक यांच्यात खेळल्या गेलेल्या T-20 सामन्यात तुर्कीचा संघ 278 धावांचा पाठलाग करताना, केवळ 21 धावांवर ऑलआउट झाला. यामध्ये झेक रिपब्लिकने 257 धावांनी विजय मिळवला.

सिडनी थंडर्स विरुद्ध अॅडलेड स्ट्रायकर्स (2022)

बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर्स आणि अॅडलेड स्टायकर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात 139 धावांचा पाठलाग करताना थंडर्सचा डाव केवळ 15 धावांवर आटोपला. टी-20च्या इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.