M S Dhoni : महेंद्रसिंग धोनीने दिले आयपीएल २०२४ मध्ये खेळण्याचे संकेत

माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एका कार्यक्रमात बोलताना गुडघ्याच्या शस्त्रक्रियेविषयीची माहिती दिली आणि त्याचवेळी आयपीएलसाठी मैदानात परतण्याचे संकेतही दिले आहेत

220
Mahendra Singh Dhoni 7 Rupee Coin : महेंद्रसिंग धोनीच्या नावाने ७ रुपयांचं नाणं खरंच बाजारात येणार का?
  • ऋजुता लुकतुके

माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एका कार्यक्रमात बोलताना गुडघ्याच्या शस्त्रक्रियेविषयीची माहिती दिली आणि त्याचवेळी आयपीएलसाठी मैदानात परतण्याचे संकेतही दिले आहेत.  (M S Dhoni)

महेंद्रसिंग धोनी हा भारताचा सगळ्यात यशस्वी क्रिकेट कर्णधार आहे. त्याच्याच काळात भारताने आयसीसीच्या तीन महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या. तसंच जागतिक क्रमवारीत पहिलं स्थानही त्याच्याच कारकीर्दीत पटकावलं. २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने निवृत्ती पत्करली. पण, चेन्नई सुपर किंग्ज या त्याच्या आयपीएल संघाकडून तो खेळतच होता. २०२३ मध्ये त्याने चेन्नईला आयपीएलमध्ये विक्रमी पाचवं विजेतेपद मिळवून दिलं. (M S Dhoni)

आणि शुक्रवारीच धोनीने बंगळुरूमध्ये एका खाजगी कार्यक्रमात २०२४ च्या आयपीएलमध्ये खेळण्याचे संकेतही दिले आहेत. या कार्यक्रमाचा एक व्हीडिओ व्हायरल झालाय आणि यात एक मुलाखतकार धोनीला प्रश्न विचारताना, ‘तुम्ही क्रिकेटमध्ये निवृत्त झाल्यावर…’ अशी सुरुवात करतोय आणि दुसरा मुलाखतकार त्याचं वाक्य अर्धवट तोडून, ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त,’ अशी दुरुस्ती त्या वाक्यात करतोय. यावर धोनीनेही ‘हो हो,’ असं म्हणत दुसऱ्या मुलाखतकारालाल दुजोरा दिला आहे आणि धोनीने तसं म्हणताच उपस्थितांनीही जोरदार टाळ्या वाजवून धोनीला पाठिंबाच दिला. हा व्हिडिओ तुम्ही इथं पाहू शकता. (M S Dhoni)

(हेही वाचा – Hamas : भारतातही हमासचा शिरकाव ?; जमात-ए-इस्लामीच्या रॅलीत हमासच्या माजी प्रमुखाचे भाषण)

या धोनीच्या मुलाखतीनंतर आयपीएलचा पुढील हंगाम खेळण्याची त्याची तयारी स्पष्टच दिसते आहे. गेल्याच हंगामात त्याने चेन्नईला विजेतेपदही मिळवून दिलं आहे. पण, स्वत: धोनी तेव्हा गुडघ्याच्या दुखापतीमुळे बेजार होता. तो फलंदाजीलाही नियमित क्रमांकावर यायचा नाही आणि स्पर्धा संपल्यावर त्याने गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करून घेतली. (M S Dhoni)

सध्या धोनी शस्त्रक्रियेनंतरच्या तंदुरुस्तीसाठी प्रयत्नशील आहे आणि नोव्हेंबरपर्यंत आपण पुन्हा खेळायला लागू असा विश्वासही त्याला वाटतोय. त्यामुळे धोनी आयपीएल खेळणार हे जवळ जवळ स्पष्ट आहे. महेंद्रसिंग धोनी आतापर्यंत आयपीएलमध्ये २५० सामने खेळला आहे आणि यात त्याने ३९ च्या सरासरीने ५,०८२ धावा केल्या आहेत. ८४ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या असून त्याने २४ अर्धशतकं केली आहेत. (M S Dhoni)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.