M. S. Dhoni : महेंद्र सिंग धोनीला हेलिकॉप्टर शॉट नेमका कुणी शिकवला? 

M. S. Dhoni : एका शाळेतील जुन्या मित्राने हा प्रसिद्ध फटका धोनीला शिकवल्याचं त्याने स्वत: सांगितलं आहे 

146
M. S. Dhoni : महेंद्र सिंग धोनीला हेलिकॉप्टर शॉट नेमका कुणी शिकवला? 
M. S. Dhoni : महेंद्र सिंग धोनीला हेलिकॉप्टर शॉट नेमका कुणी शिकवला? 
  • ऋजुता लुकतुके 

महेंद्रसिंग धोनीचा (M. S. Dhoni) जगप्रसिद्ध हेलिकॉप्टर शॉट माहीत नाही असा एखादाच क्रिकेट चाहता असेल. या फटक्याने त्याने जगभरातील भल्या भल्या गोलंदाजांची झोप उडवून दिली होती. पण, हा फटका त्याला नेमका शिकवला कुणी याचं उत्तर आता स्वत: महेंद्रसिंग धोनीने दिलं आहे. धोनीचा जुना शालेय मित्र संतोष लालकडून धोनी हा फटका शिकला.

(हेही वाचा- Ravichandran Ashwin : अश्विनने मोडला अनिल कुंबळेचा ‘हा’ विक्रम)

संतोष लाल आणि धोनी एकत्र रांचीत वाढले. क्रिकेटचे धडेही त्यांनी एकत्र गिरवले. संतोष हा ही एक आक्रमक क्रिकेटपटूच होता. त्याने हा फटका शोधूनही काढला. जरा लेग साईडला जाणारा चेंडू दिसला की, तो बॅट दांडपट्ट्यासारखी हवेत फिरवून चेंडू पार सीमारेषेपलिकडे टोलवत असे. ही दैवी देणगीच त्याला लाभली होती. संतोषला जवळून खेळताना पाहणाऱ्या धोनीने हा फटका लगेचच आत्मसात केला. (M. S. Dhoni)

‘आता हेलिकॉप्टर शॉटचं पेटंटच जवळ जवळ महेंद्रसिंग धोनीला मिळालं आहे. पण, धोनीच्या लहानपणी आणखी एक खेळाडू होता जो हा फटका जास्त सफाईने मारत होता. धोनी आणि संतोष एकत्र क्रिकेट खेळले. ते टेनिसबॉलने खेळायचे तेव्हाची ही गोष्ट आहे. संतोषला बघून बघून धोनी हा फटका मारायला शिकला. दोघं रेल्वेतही एकत्र खेळत होते,’ असं दोघांना ओळखणारा एक जुना मित्र निशांत दयालने अलीकडेच इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं. (M. S. Dhoni)

(हेही वाचा- पाकिस्तानी चित्रपट ‘The Legend of Maula Jatt’ भारतात प्रदर्शित होणार नाही! जाणुन घ्या काय आहे कारण?)

महेंद्रसिंग धोनी आणि संतोष लाल शेवटपर्यंत चांगले मित्र राहिले. धोनी आंतरराष्ट्रीय यशाच्या पायऱ्या चढत गेला. पण, संतोष लाल झारखंड संघाच्या पुढे राष्ट्रीय क्रिकेट खेळू शकला नाही. त्याला क्रिकेटवर रेल्वेत नोकरी मात्र मिळाली. पण, अशातच २०१३ मध्ये यकृताच्या दुखण्यात त्याचा मृत्यू ओढवला. ३२ व्या वर्षीच संतोषची जीवनयात्रा संपली. दोघांमधील मैत्री मात्र कायम राहिली. (M. S. Dhoni)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.