महाराष्ट्राच्या कन्येची तुर्कीत सुवर्णपदकाला गवसणी; ‘चेस बॉक्सिंग’मध्ये मिळवले मोठे यश

86

तुर्की देशात संपन्न झालेल्या चेस बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मराठमोळ्या माधवी गोणबरे हिने सुवर्णपदक पटकावले आहे. बऱ्याच कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन तिने हे यश प्राप्त केले आहे. चेस बॉक्सिंग या खेळात ३ मिनिटे चेस (बुद्धिबळ) आणि ३ मिनिटे बॉक्सिंग असे दोन्ही खेळ खेळावे लागतात. त्यामुळे या खेळात खेळाडूला मानसिक आणि शारिरीक असे दोन्ही कौशल्य सिद्ध करावे लागते. चेस बॉक्सिंगच्या उपांत्य फेरीत ६ तर अंतिम फेरीत सात राऊंड खेळवले जातात. अशा या अनोख्या खेळात माधवीने जागतिक स्थरावर तब्बल चार वेळा यश मिळवले आहे.

( हेही वाचा : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा विश्वविक्रम! अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच फलंदाज)

‘सुवर्णकन्या’ माधवी गोणबरे

माधवी हिने जवळपास इयत्ता १४ वी पासून चेस बॉक्सिंग खेळायला सुरूवात केली. अथक परिश्रमाच्या जोरावर माधवीने २०१७ मध्ये पहिली चेस बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा खेळली. जागतिक स्थरावरील पहिल्याच स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले. यानंतर २०१८, २०१९ मध्ये तिला अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक मिळाले. २०२२ मध्ये तुर्कीमध्ये संपन्न झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये माधवीने सुवर्णपदक जिंकत अभिमानास्पद कामगिरी केली.

New Project 2 20

रशियाच्या खेळाडूला हरवत सुवर्णपदकाला गवसणी 

यासंदर्भात माधवी गोणबरे हिच्याशी हिंदुस्थान पोस्टने संवाद साधला असता ती म्हणाली,

चेस बॉक्सिंग हा खेळ म्हणजे बुद्धी आणि ताकद याचा संगम आहे. माझे पदवीशिक्षण झुनझुनवाला महाविद्यालयातून पूर्ण झाले असून याचदरम्यान मी चेस बॉक्सिंगची नॅशनल लेव्हल टूर्नामेंट दहिसर येथे खेळले. २०१७ मध्ये जागतिक चेसबॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर मी सहायक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी सरांच्या संपर्कात आले. सरांच्या माध्यमातून काही लोकांनी मला मदत केली. तसेच माझ्या दुसऱ्या जागतिक चेस बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी मला संपूर्ण मदत अविनाश सरांनी केली होती. २०१९ मध्ये धर्माधिकारी सर आणि लविता पॉवेल मॅम यांनी मला तिसऱ्या जागतिक चेस बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी क्राउड फंडिंगकरता मोठी मदत केली. यासोबतच लविता पॉवेल मॅम यांनी मला पोस्ट ग्रॅज्युएशन/मास्टर्स ऑफ मॅनेजमेंटपर्यंता अभ्यास पूर्ण करण्यास सुद्धा मदत केली. या संपूर्ण वाटचालीत हे लोक माझ्यासोबत होते म्हणून मी इथवर पोहोचू शकले. २०२२ मध्ये उमंग फाऊंडेशनाच्या आशिष गोयल यांनी मला जगातील पहिल्या शू लॉंड्रीचे कंपनीचे (संदीप गजकस) आणि बियॉन्ड सीड कंपनीचे (कुलदीप मिराणी) प्रायोजकत्व मिळवून दिले. नुकत्याच तुर्की येथे झालेल्या चेस बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत माझा सामना रशियाच्या क्रिस्टिना हिच्याशी झाला आणि या स्पर्धेत मला सुवर्णपदक मिळाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.