- ऋजुता लुकतुके
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात एका जिन्समुळे नॉर्वेचा माजी जगज्जेता बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन (Magnus Carlsen) वादात सापडला होता. फिडेच्या स्पर्धांसाठी असलेल्या पेहरावाच्या आचारसंहितेचा भंग केला म्हणून त्याच्यावर दंडासह स्पर्धेतून बाद होण्याची कारवाई झाली होती. पण, जिन्स घालण्याचा कार्लसनचा (Magnus Carlsen) हट्ट कायम होता. ब्लिट्झ प्रकारात बाद घोषित केल्यावर त्याने जलदगती बुद्धिबळ खेळायलाही नकार दिला. मग अखेर आयोजकांनी आचारसंहितेत काहीशी सूट दिल्यावर तो खेळायला तयार झाला.
‘मला फिडेच्या जाचाचा कंटाळा आला आहे. आणि इथून पुढे मी फिडेच्या स्पर्धेत कधीही खेळणार नाही,’ असं वैतागून कार्लसनने (Magnus Carlsen) जाहीर केलं होतं. तेव्हापासून काही ना काही कारणांनी फिडे आणि कार्लसन आमने सामने आले आहेत. आता तर खुद्द कार्लसननेच एक नवीन कारण या द्वंद्वासाठी दिलं आहे. ज्या जिन्समुळे त्याच्यावर बंदी आली ती त्याने जाहीर लिलावासाठी उपलब्घ करून दिली आहे.
‘बंदी आणलेली जिन्स’ लिलावासाठी उपलब्ध असं त्याने आपल्या ताज्या ट्विटर (Twitter) पोस्टवर लिहिलं आहे.
(हेही वाचा – Champions Trophy 2025 : हार्दिक पंड्या २००, तर कुलदीपचे ३०० बळी पूर्ण)
The forbidden jeans – can now be yours
I am auctioning my jeans. A sentence I never thought I would write. But here we are.
All proceeds go to the Big Brothers Big Sisters program🙏
*Game wornhttps://t.co/qgMlBdIkQq
— Magnus Carlsen (@MagnusCarlsen) February 19, 2025
(हेही वाचा – Mahakumbh 2025 : महाकुंभमधील हायटेक खोया-पाया केंद्राने केली उल्लेखनीय कामगिरी; ‘असे’ चालते काम)
ई-बे वर कार्लसनने (Magnus Carlsen) या जिन्सचा लिलाव पुकारला आहे. आणि ‘ही जिन्स त्या दिवशी सामन्यासाठी घातलेलीच आहे. आणि त्यानंतर धुतलेली नाही,’ असंही कार्लसनने लिहिलं आहे. १ मार्चपर्यंत या जिन्सचा लिलाव सुरू राहणार आहे. आणि आतापर्यंत ८००० डॉलरची सर्वाधिक बोली जिन्ससाठी लागल्याचंही कार्लसनने (Magnus Carlsen) म्हटलं आहे.
या घटनेमुळे बुद्धिबळ जगताशी संबंधित लोकांचं कुतुहल वाढलं आहे. कार्लसन (Magnus Carlsen) सध्या फिडेच्या क्रमवारीत अव्वल खेळाडू आहे. पण, अलीकडे फिडेशी त्याचं पटत नाहीए. जिन्सच्या विक्रीतून येणारी किंमत सेवाभावी संस्थेला दान केली जाणार असल्याचंही कार्लसनने (Magnus Carlsen) म्हटलं आहे. जिन्सवरून झालेला वाद पाहता, या लिलावाला कसा प्रतिसाद मिळतो याकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community