महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धेत रविवार, २ फेब्रुवारी झालेल्या कुस्तीच्या स्पर्धेत वाद निर्माण झाला. हा वाद इतका विकोपाला पोहचला की, पैलवान शिवराज राक्षे याने पंचाच्या निर्णयावर संताप व्यक्त करून त्याने थेट पंचाला लाथ मारली. आपले दोन्ही खांदे जमिनीला टेकले नव्हते तरीही पंचांनी मला पराभूत ठरवण्यासाठी घाई केली, असा दावा राक्षे याने केला.
(हेही वाचा आंध्र प्रदेशातील Pakistan वसाहतीचे अखेर झाले नामांतर; जाणून घ्या काय आहे नवे नाव?)
या वादामुळे या स्पर्धेला (Maharashtra Kesari) गालबोट लागले. गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षे व पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली. यात मोहोळ याने राक्षे याचा पराभव केला. पण राक्षे याने यावर आक्षेप घेतला. राक्षे याने पंचाने चुकीचा निर्णय घेतला आहे. रिपल्पे बघून पुन्हा कुस्ती लढवावी, अशी मागणीही केली. आक्रमक झालेल्या राक्षे याने पंचाची कॉलर धरली आणि लाथही मारली. यानंतर खूप वेळ मैदानात गोंधळ सुरु होता. शेवटी पंचाचा निर्णय अंतिम राहिल, असे कमिटीने सांगितले. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राक्षे याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण राक्षे खूपच आक्रमक झाला होता. (Maharashtra Kesari)
Join Our WhatsApp Community