महाराष्ट्र केसरी पहिला टप्पा; ऑलिम्पिक ध्येय ठेवा; शरद पवारांचे महाराष्ट्र केसरी विजेत्याला आवाहन नुकतेच राज्यात ६५वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली. त्यामध्ये पहिलवान शिवराज राक्षे याने महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावला. त्याचे एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिनंदन करत महाराष्ट्र केसरी हा पहिला टप्पा आहे, ऑलिम्पिक हे लक्ष्य ठेवा, असे आवाहन केले.
काय म्हणाले शरद पवार?
भारतीय खेळ कब्बडी, खो खो या खेळांसह आपण क्रिकेटलाही सहकार्य केले, कुस्तीसारख्या क्षेत्रात खेळाडूंना स्वतःची तयारी करणे, मेहनत करणे या गोष्टी खर्चिक असतात, त्या मुलांना मदत कारण्याबरोबर त्यांना उत्तम प्रशिक्षण देणे ही जबाबदारी काका पवार यांनी घेतली. आम्हीही त्यासाठी मदत केली, आता पर्यंत ७५ लाख रुपये दिले, याची वाच्यता कधीच कुठे केली नव्हती. महाराष्ट्र केसरी हा पहिला टप्पा आहे, खरे तर राष्ट्रीय आणि आशिया स्पर्धा त्याच्याही पुढे ऑलिम्पिक हे आपले उद्देश असले पाहिजे. खाशाबा जाधव हे एकमेव होते जे ऑलिम्पिकपर्यंत पोहचले होते, त्यानंतर कुणीही तिथपर्यंत पोहचले नाही, आमची अपेक्षा आहे ती तुम्ही पूर्ण कराल, असे शरद पवार म्हणाले.
(हेही वाचा ‘वन-डे’मध्ये विराटच बेस्ट; विश्वविक्रमापासून तीन शतके दूर)