जो हारा वही सिकंदर (शेख)!

432

नॅरेटिव्ह सेट करण्यात डाव्या विचारसरणीचा हात कुणीच पकडू शकत नाही. विचार करा, आज ही विचारसरणी इतका हैदोस घालते आहे, तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक वर्षे कॉंग्रेसची सत्ता होती, त्या दरम्यान यांनी काय काय केले असेल. कॉंग्रेसचा या मंडळींना उघड पाठिंबा होता. या मंडळींनी आपला इतिहास दूषित केला. आपल्या संस्कृतीवर, धर्मावर, परंपरेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. हिंदूंना नेहमी आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. जातीजातींमध्ये भांडणे लावली, मुस्लिमांना मूळ प्रवाहात येऊ न देता नेहमी हिंदूंच्या विरोधात उभे केले.

आता हसन मुश्रीम यांच्यावर कायदेशीर कारवाई होते, तेव्हा मुस्लिम कार्ड खेळले जात आहे. नवाब मलिक यांच्या बाबतीतही तीच परिस्थिती. आपण मुस्लिम आहोत म्हणून आपल्यावर अन्याय होतो, असा आरडाओरडा केला जातो आहे. मुळात भारतात मुस्लिम समाज खूपच सुरक्षित आहे व सुखी देखील आहे. त्यांची वाढलेली लोकसंख्या सांगते की त्यांच्यावर आजपर्यंत मुस्लिम म्हणून निर्बंध लावण्यात आली नव्हती.

(हेही वाचा मुंबईत कुठे कुठे आहेत जोशीमठ?)

ज्यावेळी आतंकवादाचा विषय असतो तेव्हा मात्र आतंकवादाला धर्म नसतो, मात्र हसन मुश्रीफ, नवाब मलिक जेव्हा अडचणीत येतात तेव्हा मात्र त्यांना धर्म आठवतो. आफताब पूनावालाला धर्म नसतो परंतु पैलवान सिकंदर शेखला मात्र धर्म असतो. सिकंदरवर मुस्लिम असल्या कारणाने अन्याय झाला आहे, असा आरोप करण्यात येत आहे. “माझ्यावर झालेला अन्याय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय” असे सिकंदर शेखने म्हटले आहे. यात आणखी ट्विस्ट आले आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवान सिकंदर  शेख विरोधात चार गुण दिल्याने पंच मारूती सातव यांना धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिस दलातील शिपाई संग्राम कांबळे यांनी फोनवरून धमकी दिल्याची तक्रार पंच मारूती सातव यांनी केली आहे. पोलिस शिपाई कांबळे आणि पंच सातव यांच्यातील फोन रेकॉर्डिग सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

सिकंदरचे म्हणणे आहे की, संग्राम कांबळे यांनी धमकी दिली नाही. समजा वादासाठी जरी मानले की धमकी दिली नसून जाब विचारलाय तरी संग्राम कांबळे यांना हा अधिकार कोणी दिला? क्रिकेट, फुटबॉल इतर खेळांप्रमाणे हा देखील एक खेळ आहे. समजा अम्पायरकडून चुकीचा निर्णय देण्यात आला किंवा दिलेला निर्णय चुकीचा आहे असे वाटले तर अम्पायरला इतर व्यक्ती जाब विचारु शकते का? स्पर्धेमध्ये विजय-पराभव होत असतो. पराभव स्वीकारणे खूप महत्वाचे असते. कारण ती शेवटची स्पर्धा नसते. सिकंदरने या वादात उडी घेऊन हे सिद्ध केले आहे की, त्यालाही या घाणेरड्या राजकारणात रस आहे. मुळात सिकंदर हा एक खेळाडू आहे. मातीतला रांगडा तरुण आहे, त्याच्यात क्षमता आहे. पुढच्या वेळी कष्ट घेऊन तो ही स्पर्धा जिंकू शकतो. पण या घाणेरड्या जातीयवादी राजकारणात फसून मात्र आपली कारकीर्द खराब करुन देखील घेऊ शकतो.

(हेही वाचा अवघ्या २ दिवसात गंगा विलास क्रूझ नदीत अडकले; प्रवाशांना होडीतून आणले किनाऱ्यावर, काय आहे कारण?)

पंच मूर्ख नसतात, तिथे उपस्थित ज्युरी देखील मूर्ख नसतात. आपल्याला प्रत्येक ठिकाणी जात दिसते, मुस्लिम व्हिक्टिम कार्ड खेळले जाते. हे डाव्या विचारसरणीचे कारस्थान आहे. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या विचारसरणीने ’मुस्लिम असल्यामुळे सिकंदरवर अन्याय झाला’ हे नॅरेटिव्ह सेट करुन सगळीकडे व्हायरल केले आणि पुन्हा एकदा दोन समाजात तणावाचे वातावरण विनाकारण निर्माण केले. यांना महाराष्ट्र पेटता ठेवायचा आहे. कारण यांना महाराष्ट्रासह भारताचा पाकिस्तान करायचा आहे. मला सर्वात जास्त वाईट वाटले ते सिकंदरची मुलाखत बघून. निदान त्याने या वादात उडी न घेता, खेळाडू वृत्तीने आपला पराभव मान्य करायला हवा होता आणि खेळात हार-जित होत राहते हा संदेश देत या वादावर पडदा टाकायला हवा होता. त्याचबरोबर पुढच्या वर्षातील स्पर्धेसाठी पराभवाच्या दिवसापासूनच तयारी करायला हवी होती. यातून सिकंदर हा मराठी मातीतला आहे हे अधोरेखित झाले असते. परंतु सिकंदरने या वादात उडी घेऊन, हे सिद्ध केले आहे की तो स्पर्धा तर हरलाच आहे, परंतु मनाने देखील हरला आहे.  तरी, सिकंदरला आपली घोडचूक कळावी आणि या वादावर पडदा टाकण्याची त्याला बुद्धी व्हावी तसेच भविष्यात जातीय राजकारण न पडता खेळाकडे खेळाडू वृत्तीने पाहत आपल्या कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप सार्‍या शुभेच्छा!

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.